Smoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर `हा` गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Diabetes and Smoking: आज प्रत्येक जण आरोग्याच्याबाबतीत सर्तक असतो. मात्र, असे असताना काही निष्काळजीपणा आजाराला निमंत्रण देतो. तुम्ही डायबिटीजचे रुग्ण (Diabetes Patient) असाल तर विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. डायबिटीज असताना तुम्ही स्मोकिंग केले तर त्याचे गंभीर परिणाम (Smoking Side Effect) भोगावे लागतात. (Health News in Marathi) डायबिटीजला 'क्रोनिक डिसीज' (Chronic diseases) असेही म्हटले जाते. तेव्हा डायबिटीजच्या रुग्णांनी स्मोकिंग करणे खूप धोकादायक आहे. तुम्ही कोणत्या समस्येला सामोरे जाऊ शकता, ते जाणून घ्या.
शुगर पातळी वाढण्यास मदत
डायबिटीजच्या रुग्णांनी स्मोकिंग केल्याने तुमच्या शरिरातील शुगर पातळी वाढण्यास मदत होते. अशा वेळी डायबिटीजला कंट्रोल करणे खूप कठीण होते. तुम्हीही डायबिटीजचे रुग्ण असाल आणि स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या लोकांनी स्मोकिंग करु नये.
स्मोकिंग केल्याने हे आजार बळवतात
- स्मोकिंग केल्याने तुमच्या आतड्यावर परिणाम होते. डायबिटीजच्या लोकांना आतड्याचा त्रास जाणवतो. स्मोकिंग केल्याने डायबिटीजच्या रुग्णांच्या आतड्यांमध्ये जठरतात येते.
- डायबिटीजच्या रुग्णांनी स्मोकिंग करणे हे दुसऱ्या रोगाला आमंत्रण देणे आहे. हार्ट रुग्णांनी स्मोकिंग करणे टाळावे. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांनी स्मोकिंग किंवा तंबाखू यांसारख्या घातक गोष्टींचे सेवन केल्यास हृदयसंबंधित आजारांचा बळवतो.
- डायबिटीज असणाऱ्यांनी स्मोकिंग केल्याने याचा परिणाम हा किडनीवरही होतो. किडनीसंबंधित आजार डोकेवर काढतात. स्मोकिंग केल्याने किडनीसंबंधित आजार वाढून त्याचा तुमच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे डायबिटीजच्या लोकांनी स्मोकिंग करताना दहावेळा विचार करावा.
- डायबिटीज रुग्णांनी स्मोकिंग केल्याने शुगर पातळी कमी होते. ग्लुकोज लेव्हल कमी जास्त झाल्यामुळे तुम्ही खाली पडू शकता किंवा चक्करही येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावधान व्हा. जेव्हा तुम्ही डायबिटीजअ सताना स्मोकिंग करता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण कमी जास्त होत असते.
- डायबिटीजच्या लोकांनी स्मोकिंग केल्याने ऐल्ब्युमिनमेहात यूरिनमध्ये आणखी वाढते. त्यामुळे वाढतो. टाइप 2 डायबिटीज - स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये इतरांच्या तुलनेत टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)