मुंबई : दिवसभराच्या कामानंतर रात्री गाढ झोप लागते. अनेकदा धकाधकीच्या या आयुष्यात थकवा आल्यामुळे कधी झोप लागते याचा अंदाजही येत नाही. झोपेत काहींना घोरण्याची सवय असते. पण सावधान! काही वेळा घोरणे आरोग्यास हानिकारक देखील ठरू शकते. झोपेत घोरण्याच्या या सवयींमुळे अनेक शारीरिक व्याधी उदभवू शकतात. 
निद्राश्वसनरोग म्हणजेच 'स्लीप अॅनिया' वेळीच ओळखायला हवा. त्यामुळे या या घोरण्याच्या विकाराकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. कारण, त्यामुळे निर्माण होणारे आजार हे आयुष्य व्यापणारे, शारीरिक समस्यांना आमंत्रण देणारे असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, श्वसनरोग, पक्षाघात अशा अनेक व्याधी होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोरण्याची लक्षणे
- घोरण्यामुळे श्वास रोखला जातो
- दचकून जाग येते, पुन्हा वेगाने श्वास सुरु होतो, या क्रियेत श्वसनमार्गावर भार येतो
- झोपेतून उठल्यानंतर चिडचीड, अस्वस्थता, डोकेदुखी सुरु होणे
- एकाग्रता कमी होणे, सतत लक्ष विचलित होणे
- झोपेतून वारंवार लघवीसाठी जाण्याची इच्छा होणे
- झोपेत खूप घाम येणे
- सतत वाईट स्वप्ने पडणे


का उदभवतो हा विकार?
- अनियंत्रित वाढलेले वजन
- आनुवांशिकता
- महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते.
- साठी उलटून गेल्यानंतर निद्राश्वसनरोग होण्याची शक्यता अधिक असते
- पुरुषांमध्ये १७ इंचाहून अधिक तर स्त्रियांमध्ये १६ इंचाहून अधिक लठ्ठ असणारी मान
- अतिधुम्रपान