सूर्य ग्रहणात गरोदर महिलांनी घ्यावी विशेष काळजी, काय टाळाल आणि काय कराल?
Surya Grahan 2023 : 2023 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणात विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे .
Solar Eclipse Effect on Pergnant Ladies : हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. ग्रहण काळात अनेक कामे निषिद्ध असतात. विशेषतः गरोदर महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 2023 सालातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सुतक काळही वैध राहणार नाही. हिंदू धर्मासोबतच इस्लाममध्येही ग्रहण काळात गर्भवती महिलांबाबत काही नियम आहेत.
शनिवारचं हे सूर्यग्रहण यंदाच्या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. तसेच या महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असणार आहे. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं असतं. सामान्य लोकांप्रमाणेच गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
या गोष्टी टाळाव्यात
खरं तर सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याची किरणे हानिकारक ठरतात, त्यामुळे गरोदर महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. जेणेकरून या हानिकारक किरणांचा माता आणि मुलावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी ब्लेड, कात्री, सुया इत्यादी धारदार वस्तू वापरू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.
सूर्यग्रहण काळात काहीही खाणे किंवा पिणे टाळावे. तुम्ही काही खाल्ले तरी ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी त्यात तुळशीची पाने टाका. गरज भासल्यास औषध, पाणी, दूध, फळे इत्यादी गोष्टी घेता येतील.
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये.
सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याची किरणे घरात प्रवेश करू नयेत याकडे लक्ष ठेवा. जेणेकरून सूर्यग्रहणाची हानिकारक किरणे तुमच्यापर्यंत पोहोचू नयेत.
सूर्यग्रहण काळात कपडे घालणे टाळावे. या काळात कोणावरही रागावू नका, वाईट विचार मनात आणू नका.
ग्रहणाच्या कसा आणि काय परिणाम होतो
ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. याचा थेट परिणाम होतो की नाही याबाबत कोणताही खुलासा नाही. पण गर्भवती महिलांनी आणि सामान्य लोकांनी देखील आरोग्याची काळजी घ्यावी. सूर्यग्रहणात सूर्याची किरणे थेट शरीरावर पडणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये त्याचा डोळ्यावर परिणाम होतो. एवढंच नव्हे तर ग्रहणकाळात वातावरण चांगले नसते त्यामुळे खास काळजी घ्यावी.
या गोष्टी आवर्जून कराव्यात
सूर्य ग्रहणाचा परिणाम होतो का? याबाबत शाशंक असले तरीही काळजी घेणे गरजेचे आहे. गरोदर महिलांनी घरीच राहावे.
ग्रहण काळापूर्वी अन्नपदार्थ खाऊन घ्यावेत
ग्रहण काळ नामस्मरणात कसा जाईल याचा विचार करावा.
ग्रहण काळात वातावरण दूषित असते त्यामुळे झोपू नये स्वतःची खास काळजी ङ्य