Solar Eclipse And Lunar Eclipse : ग्रहण ही एक खगोल शास्त्रातील घटना आहे जी दरवर्षी घडत असते. 2023 मध्ये 2 ग्रहण लागणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल लागले. तर चंद्रग्रहण हे 5-6 मे रोजी होते. आता वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसांच्या फरकांनी दिसणार आहे. 


ऑक्टोबरमध्ये कधी दिसणार ग्रहण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात 14 तारखेला सूर्यग्रहण दिसणार आहे. तर 28-29 ऑक्टोबरला चंद्रग्रहण दिसणार आहे. या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर' (Rinf Of Fire) असे देखील म्हटले जाणार आहे. चंद्र पृथ्वीपासून नेहमीपेक्षा जास्त अंतरावर आहे, ज्यामुळे तो आकाराने लहान दिसतो आणि सूर्याभोवती एक वलय तयार होते. याला रिंग ऑफ फायर म्हणता येईल. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान जाते तेव्हा आंशिक चंद्रग्रहण होते. हे तिघे एकाच रेषेत येतात ज्यामुळे चंद्रग्रहण दिसते.


ग्रहणाचा शरीरावर काय होतो परिणाम 


NCBI च्या रिपोर्टनुसार ग्रहण काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पण या ग्रहणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच असा नाही. ग्रहण काळात गर्भवती स्त्रिया, बालके आणि ज्येष्ठ व्यक्तींना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 


काय काळजी घ्यावी 


  • गर्भवती महिलांना या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 

  • ग्रहण काळात महिलांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो. 

  • ग्रहण काळात आहारावर देखील विशेष लक्ष दिले जाते 

  • ग्रहण काळात काय खावे आणि काय खाऊ नये या गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे आहे. 


आरोग्यावर काय परिणाम होतो 


ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. याचा मानवी जीवनावर कळत नकळत परिणाम होतो. हिंदू पौराणिक कथांमध्ये देखील ग्रहण हानिकारक असल्याचं सांगितले आहे. या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी विज्ञानाच्या दृष्टीकोनातूनही ग्रहण काळात काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहणातून बाहेर पडणाऱ्या लहरी शरीरासाठी हानिकारक असतात. 


डोळ्यांवरही होतो परिणाम 


ग्रहण काळात ते उघड्या डोळ्यांनी सहज पाहू नये. ग्रहण पाहताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेची असते. NCBI च्या रिपोर्टनुसार, ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्याचा रेटिना खराब होतो. अनेक प्रकरणांमध्ये ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे डोळे गेल्याच्या घटना देखील कानावर परडले आहेत. तसेच संवेदनशील डोळ्यांना देखील इजा होऊ शकते.