इम्यून सिस्टम वाढवायचीय, आहारात `या` गोष्टींचा समावेश करा
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची आहे ? आजपासून आहारात `या` पदार्थाचा समावेश करा
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोकांना आजारपणाच्या समस्या भेडसावतात. या आजारपणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुमची इम्यून सिस्टम (immune system) चांगली असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, हे जाणून घेऊयात.
सोयाबीनमध्ये (Soyabean) भरपूर पोषक असतात. सोयाबीनमध्ये असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानेही हे सत्य स्वीकारले आहे. सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्हाला हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल आणि तुमची प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल, तर तुम्ही तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये सोया नगेट्स, सोया मिल्क, सोया फ्लोअर, सोया नट्स आणि टोफू यासारखे सोया पदार्थ समाविष्ट करू शकता.
हार्टसाठी फायद्याचं
शाकाहारी अन्नामध्ये सोयाबीन (Soyabean) हा सर्वाधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहे. त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणही खूप कमी असते. सोया शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. सोयाबीनमध्ये आर्जिनिन एमिनो अॅसिड आणि आयसोफ्लाव्होन असतात जे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले गुणधर्म रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका राहत नाही.
प्रतिकारशक्ती वाढते
सोयाबीनमध्ये (Soyabean) असलेले प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. सोयाबीनच्या सेवनाने रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. यामुळेच कोरोनाच्या वेळी FSSAI ने सोया फूडचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला होता. सोया फूड खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. ताप, सर्दी सारख्या समस्या भेडसावणार नाहीत.
इतर रोगांवर फायदेशीर
सोयाबीनमुळे (Soyabean) साखरेची पातळीही (Blood Sugar) नियंत्रणात राहते. हे पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. याच्या सेवनाने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. सोया पदार्थ देखील दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच मानसिक संतुलन राखते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)