Male Fertility : पुरुषांच्या Testicles मध्ये दिवसभरात लाखो स्पर्म्स (Sperm) तयार होतात. मूल होण्यासाठी स्पर्म्स आणि त्यांची गुणवत्ता हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. इजेक्शनच्या वेळी पुरुषांच्या टेस्टिकल्समधून वीर्य रुपात हे शुक्राणू बाहेर येतात. वीर्यामधील स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी (Male Fertility) अवलंबून असते. स्पर्म्सच्या हालचालीमध्ये असलेल्या वेगावरुन ते स्त्रीच्या अंडाशयापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात. ज्यामुळे पुढे गर्भधारणा होण्याचा मार्ग मोकळा होत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Excretion च्या वेळी किमान 1.5 ते 5 मिलीलीटर स्पर्म बाहेर पडतात. जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) केलेल्या सर्वेक्षणानुसार सामान्यत: वीर्यामध्ये स्पर्मची संख्या 15 मिलीलीटर इतकी असते. मात्र यापेक्षा कमी संख्या असल्यास या समस्येला ओलिगोस्पर्मिया (oligospermia) असं म्हणतात. ज्यामुळे वंधत्वासारखी गंभीर समस्या देखील उद्भू शकते.


पुरुषांमध्ये या कारणांमुळे स्पर्म काऊंट (Sperm Count) होतो कमी


उष्णता


Sperm अतिसंवेदनशील असतात. जे लोक उष्ण प्रदेशात राहतात, त्या पुरुषांमध्ये Sperm ची निर्मिती कमी होते. हॉट बाथटब, हॉटशॉवर तसेच जकुझी घेणाऱ्या आणि घट्ट अंर्तवस्त्र घालणाऱ्या पुरुषांच्या Sperm च्या संख्येत घट होते.


रेडिएशन (Radiation)


संशोधनानुसार, रेडीएशनच्या (Radiation) संपर्कात सतत काम करणाऱ्या पुरुषांचा Sperm काऊंट कमी होतो. यासाठी रेडीएशनच्या संपर्कापासून शक्य तितकं दूर राहिलं पाहिजे.


वय (Age)


वाढत्या वयानुसार (Age) पुरुषांमध्ये Sperm ची संख्या आणि गुणवत्ता (Sperm Count and Quality) खालावते. त्यामुळेच फर्टिलिटी हळूहळू कमी होते. एका संशोधनानुसार, जे पुरुष उशीरा बाळासाठी प्रयत्न करतात त्यांची मुले जन्माच्या वेळी Sperm ची गुणवत्ता कमी झाल्यानं हेल्दी नसतात.


गंभीर दुखापत 


पुरुषांच्या Testicles ला गंभीर दुखापत झाली असल्यास त्याचा थेट परिणाम Sperm च्या गुणवत्तेवर होतो. Sperm ची निर्मिती करण्याऱ्या पेशींना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने Sperm ची संख्या कमी होते.


स्मोकिंग (Smoking)


धुम्रपान करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. अति प्रमाणात धुम्रपान केल्यास वीर्यामधील केडमियमची (Cadmium) पातळी वाढते. केडमियम Sperm मधील डीएनए कमी करतो. तसंच यामुळे Sperm ची संख्याही कमी होते.


तणाव (Stress)


कामाच्या ठिकाणी अति ताण-तणाव असल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या हॉर्मोन्सवर होतो. त्यामुळे Sperm ची निर्मिती कमी होऊ लागते. जीवनातील सायकॉलॉजिकल स्ट्रेसचा परिणाम स्पर्मच्या संख्येवर व गुणवत्तेवर होतो, असं एका संशोधनात आढळलं आहे.


प्रदूषण (Polution)


वातावरणातील प्रदूषणाचा देखील शुक्राणूंवर परिणाम होतो. यासाठी लीड, मर्क्युरी या केमिकल्स तसेच किटकनाशकांपासून दूर रहा.