मुंबई : चमच्याचा वापर स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी मर्यादीत नाही. आरोग्यशास्त्रामध्ये चमच्याच्या मदतीने निदान आणि आरोग्यातील बिघाडाबद्दल संकेत मिळवण्यासाठीही केला जाऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? अवघ्या मिनिटाभराच्या वेळात चमचा आरोग्याबाबत काही काही संकेत देऊ शकतो. त्यावरून किडनीचे विकार ते अगदी मधूमेहाचेही निदान होऊ शकते.  मग पहा घरच्या घरी कशी कराल ही टेस्ट ?  


 चमच्याच्या मदतीने कशी कराल टेस्ट ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 चमचा उलटा धरून जीभेवर घासा. त्याला पुरेशी लाळ लागेपर्यंत जीभेवर घासा. त्यानंतर हा चमचा पारदर्शक आणि स्वच्छ पॉलिथीन बॅगेमध्ये टाकून पॅक करा. मिनिटाभरासाठी ही पॉलिथीन लाईटखाली धरा.  


 
 निदान काय ?  


 या प्रयोगानंतर चमच्यावर काही बदल दिसून येतील. त्याचा अर्थ काय  हेदेखील जाणून घ्या. 


मधूमेह  : मिनिटाभरानंतर जर तुम्हांला गोडसर वास आला तर मधूमेहाचा त्रास वाढत असल्याचे समजावे. 


थायरॉईड : चमच्यावर जर पिवळा थर आढळला तर थायरॉईडचा त्रास असू शकतो.  


कोलेस्ट्रेरॉल : जर चमच्यावर जांभळ्या रंगाचा थर दिसला तर यामुळे रक्ताभिसरणाच्या क्रियेमध्ये बिघाड किंवा शरीरात कोलेस्ट्रेरॉल साचून राहिल्याचा धोका संभावतो.  


बॉडी इंफेक्शन : जर पांढरट रंगाचा थर निर्माण झाला तर शरीरात बॉडी इंफेक्शन असू शकते. 


किडनी विकार : चमच्यावर जर नारंगी रंगाचा थर निर्माण झाला असेल तर हा किडनी विकाराचा धोका संभावतो.  


चमच्याच्या मदतीने केली गेलेली ही चाचणी केवळ घरगुती चाचणी आहे. सोबतच हा केवळ अंदाज असतो. तुम्हांला आरोग्याच्या बाबतीत कोणताही त्रास जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.