हार्ट सर्जरी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी
हृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.
मुंबई : हृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.
सरकार आणि नॅशनल फॉर्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटी (एनपीपीए) वर स्टेंट बनवणारी कंपनी सतत दबाव देत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की स्टेंटवर लावण्यात आलेल्या कॅपला हटवा अन्यथा आम्ही चांगल्या क्वालिटीची निर्यात थांबवू अशी धमकी त्यांनी दिली आहे. याचा निर्णय येत्या वर्षातील जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे.
हॉस्पिटलने वाढवला खर्च
एनपीपएने जेव्हापासून हृदय विकाराच्या उपचारात येणाऱ्या स्टेंटच्या किंमतीत वाढ केली तेव्हा पासून डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलच्या खर्चात वाढ केली आहे. कधी काळी असा विचार केला जात असे की बायपास करणे अतिशय सोपे आहे. मात्र आता तशी वेळ राहिलेली नाही. स्टंटचा प्रयोग बायपास सर्जरी आणि एंजियोप्लास्टी दोघांमध्ये ही केला जातो.
यामुळे रूग्णांना अधिक पैसे भरावे लागतात. हा बोजा कधी कमी होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण योग्य दर न मिळाल्यामुळे कंपनी स्टेंट योग्य क्वालिटीचे देत नाही. आणि यामुळे रूग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उभा राहिला आहे.