मुंबई : बऱ्याचदा म्हटलं जातं, पेट खुश तो हम खुश... किंवा पुरुषाच्या मनाचा मार्ग पोटातून जातो... हे सर्वकाही खरं. पण, यातही महत्त्वाची बाब म्हणजे निरोगी आयुष्याचं गुपितही याच पोटात दडलंय. पोट बिघडलं की काही सुधरत नाही, चिडचीड होते, प्रकृती खालावते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे असं का होतं याची कारणं आपल्या अनियमित जीवनशैलीतून मिळतात. पचनक्रिया व्यवस्थित होत नसल्याच त्याचे पोटाच्या आरोग्यावर थेट परिणाम दिसून येतात. 


बाहेरचं खाणं, अवेळी खाणं, खाण्यामध्ये असणारा असमतोल या सर्व सवयींचा थेट संपर्क हा आपल्या पचनक्रियेशी असतो. यावर उपाय म्हणून खालील सवयी आचरणात आणाव्यात. 


नियमित व्यायाम
शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं कधीही महत्त्वाचं ठरतं. किमान पंधरा मिनिटांचा व्यायाम आणि योग्य त्या शारीरिक कवायती मोठ्या फायद्याच्या ठरतात. 


रात्री उशिरा जेवू नका
आतड्यांचं आरोग्य जपण्यासाठी रात्रीच्या वेळी हलकं अन्न घ्यावं. शिवाय रात्रीलवकरच जेवण उरकावं. झोपण्यापूर्वी जड अन्न पचन होण्यास अडचणीचं ठरतं. शिवाय रात्री उशिरा जेवण्याची सवयही आरोग्यासाठी घातक ठरते. 


आलं किंवा आलंयुक्त पदार्थ 
आल्याचं मुळ हे पोटासाठी अतिशय फायद्याचं. पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही आल्याचा वापर होतो. 


दालचिनी 
दालचिनीचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. शिवाय रक्तातील साखरेचं प्रमाणंही नियंत्रणात राहतं. 


ताणतणावापासून दूर राहा 
ताणतणावाचा फक्त मानसिकच नाही, तर शारीरिक परिणामही होत असतो. ज्यामुळं आतडी कमकुवतही होतात. परिणामी जेव्हा जेव्हा निरोगी राहण्याचा सल्ला दिला जातो तेव्हातेव्हा पोट स्वच्छ आणि व्यवस्थित असणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.