मुंबई : आजकाल 'ताण' हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्पर्धा' ही लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सार्‍यांच्याच आयुष्यातील एक भाग बनत चालला आहे. शिक्षण,नोकरी, करिअर ,पैसा अशा अनेक गोष्टींच्या मागे धावताना आपल्याला खरा आनंद कशात आहे ? हे बघायलाच वेळ मिळत नाही. 


ताणतणाव तुमच्या आयुष्याचा एक भाग असला तरीही त्याचे व्यवस्थापन करणेदेखील गरजेचे आहे. अन्यथा आजकाल तिशीतील तरूण देखील नैराश्याच्या विळख्यात अडकताना किंवा कॅरडिएक अरेस्टच्या झटक्याने क्षणात संपत आहे. 
मग तुमच्यावरही ताण तणाव असेल तर या काही छंदांचा आनंद घेऊन त्याला तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. 


कलरींग बुक - लहानपणी जशी चित्र रंगवण्यासाठी पुस्तकं मिळायची तशी आता प्रौढांनादेखील कलरींग बुकची सोय उपलब्ध आहे. तुम्ही बाजारातून नवं पुस्तक आणा किंवा घरच्या घरी एखादं चित्र काढून रंगवण्याचा प्रयत्न करा. 


हस्तकला - ताण कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्हांला आनंद मिळेल अशी कोणतीही गोष्ट करा. मग एखादं बुकमार्क बनवा, तुमच्या मोबाईलसाठी बॅककव्हर बनवा. क्विलिंग करून एखादी वस्तू बनवा. किंवा टाकाऊपासून टिकाऊ एखादी तुमच्या फायद्याची वस्तू बनवा. 


पुस्तकं वाचा - पुस्तकं किंवा वाचण्यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. तुम्हांला दुसर्‍या विश्वामध्ये घेऊन जाईल असे तुमच्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचा.  


गाणं - संगीतामध्ये अद्भुत जादू आहे. तुमच्या आवडीच्या प्रकाराचे, कलाकाराचे गाणे ऐका. किंवा तुम्हांला एखादं वाद्य येत असल्यास त्याचं वादन किंवा आनंद घ्या, यामुळे तुमच्या मनात नकळत साचून राहिलेली नकारात्मक भावना दूर होण्यास  मदत होईल.  


बागकाम - निसर्ग नेहमीच तुम्हांला नवी उर्जा देते. घरातील बागकाम करा. झाडांची काळजी घ्या. नवी झाडं लावा. यामुळे तुमच्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल.