मुंबई : गुगलवर आपण प्रत्येकजण दिवसातून अनेक गोष्टी सर्च करत असतो. कोणतीही अडचण आली तर गुगल बाबा आहे ना? असं म्हणतं त्या प्रश्नाचं उत्तर आपण गुगलकडून मिळवतो. अगदी आपल्या आरोग्यापासून ते रोजच्या जीवनातील प्रश्नांना गुगल देखील उत्तर देत असतो. मोठी माणसं अनेकदा म्हणतात हे गुगल आलं पण मुलांच शोधणं कमी झालं आहे. आज लहान मुलं ही सर्रास गुगलवर सर्च करून अभ्यास करतात. असं सगळं असताना आता एक धक्कादायबक बाब समोर आली आहे. गुगलवर एका शब्दाचा सर्च अधिक झाला आहे. आणि हा सर्च आपल्या सगळ्यांनाच धोकादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या आजारात 'तणाव' म्हणजे स्ट्रेसचा सहभाग आहे. जगातील सर्वाधिक देशांत गूगल ट्रेंडवर 'स्ट्रेस' हा शब्द सर्वाधिक वर असल्याच समोर आलं आहे. मेडिकल हेल्थ प्लानने एका अभ्यासात याचा खुलासा केला आहे. हा शब्द अमेरिका राज्यात सर्वाधिक सर्च केला जातो. 


सर्च इंजिनमध्ये सर्वाधिक टाइप केला जाणार म्हणजे 'तणाव'. नात्यात येणारा दुरावा तसेच कामामुळे येणारा एक स्ट्रेस यामुळे लोकं एक तणावपूर्वक आयुष्य जगत आहेत. तणावा पाठोपाठ दुसरा एक शब्द सर्वाधिक सर्च केला जातो तो म्हणजे 'झोपेची कमी'. हा शब्द गुगलवर अधिक सर्च केला जातो. या पाठोपाठा "डायझेशन' पचनशक्तीची समस्या आज प्रत्येक माणसाला भेडसावत आहे.