Stress Free Morning Routien:  आजकालच्या धावपळीच्या दुनियेत प्रत्येकालाच स्ट्रेस येतो. रोज उठा पळा, ट्रेन पकडा, कामावर जा आणि पुन्हा कामावरून घरी या. या दररोजच्या क्रियेत आपल्याला खुप स्ट्रेस येतो. यामुळे आपण खुप तणावात जातो. आपली चिडचिड होते, कामात मन लागत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता. 


हे उपाय करून बघा 


मेडीटेशन करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसाची योग्य सुरुवात करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे मेडीटेशन करा. याद्वारे तुम्ही स्वत:ची मानसिक तयारी करू शकाल. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते. मेडिटेशनमुळे तुम्ही दिवसभर कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.


पाणी प्या


चांगल्या आरोग्यासाठी सकाळी उठून पाणी पिणे खूप गरजेचे आहे. हे शरीराला हायड्रेट करते. सकाळी काहीही खाण्यापूर्वी एक ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करा. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाणी देखील पिऊ शकता. अर्धा लिंबू पिळून त्यात टाका. त्यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. यासोबतच झोपेमुळे होणारा हँगओव्हर निघून जाईल आणि ताजेपणा येईल. 


चहा अथवा कॉफी प्या


जर तुम्ही चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर दिवसभर सतर्क राहण्यासाठी तुम्ही या दोनपैकी कोणत्याही गोष्टीचा तुमच्या दिनक्रमात समावेश करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीनेही करू शकता.


पेपर वाचा 


सकाळी उठल्या उठल्या फोन हातात न घेता वृत्तपत्र वाचा. ते तुम्हाला अपडेट ठेवते. तुम्हाला हवे असल्यास घरातील सदस्यांशी बोला. तणावमुक्त दिवस घालवण्यासाठी सकाळी मोबाईलपासून अंतर ठेवा. हे तुम्हाला तणावपूर्ण आणि चिंताग्रस्त सकाळ देऊ शकते.


नाश्ता वगळू नका 


ऑफिसला पोहोचण्याच्या घाईत अनेकजण नाश्ता सोडतात किंवा अर्धा अपूर्ण खातात, पण असे केल्याने चयापचय बिघडते आणि शरीराला ऊर्जा मिळत नाही, घाईघाईत नाश्ता सोडू नका.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)