Stress Management: आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला जबाबदाऱ्यांचे ओझे आहे, ज्यामुळे तणाव येतो, पैशाची कमतरता, परीक्षेत अपयश अशा अनेक कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमात किंवा मैत्रीत फसवणूक होणं, आजारी पडणे इ. तुम्हाला माहीत आहे का की चुकीची लाइफस्टाइल आणि अस्वस्थ आहारामुळेही तणाव निर्माण होतो. अनेक वेळा मेंदू अचानक काम करत नाही आणि आपली विचार करण्याची शक्तीच संपली असे दिसते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी काही वाईट सवयी सोडूनं आवश्यक आहे.


मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या सवयी सोडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाश्ता वगळणे
अनेकदा आपल्याला सकाळी शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्याची घाई असते, त्यामुळे आपला नाश्ता चुकतो, पण ही सवय योग्य नाही, कारण त्यामुळे कमजोरी येते आणि म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत नाश्ता खा.


गोड अन्न पदार्थ
गोड पदार्थांचे सेवन केल्यानं आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. या कारणामुळे मिठाई, शीतपेयं, आईस्क्रीम यांसारख्या गोष्टी टाळा. त्याऐवजी ज्या गोष्टींमध्ये नैसर्गिक साखर असते, उदा. नारळपाणी, खजूर इत्यादींचे सेवन करा. 


हेही वाचा : Health Tips: चहा प्यायल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, होऊ शकतं नुकसान


खूप राग येणे
राग येणे हे मानसिक आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. तुम्ही कितीही तणावात असलात तरी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे कारण याचा थेट परिणाम आपल्या मेंदूच्या नसांवर होतो, ज्यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात.


कमी झोप
चांगल्या आरोग्यासाठी योग्य झोप पूर्ण झाली पाहिजे, निरोगी प्रौढ व्यक्तीनं दिवसातून किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचा मेंदू नीट काम करू शकणार नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)