टॉयलेटमधील हँड ड्रायरमधून पसरतात आजार
पाहा ही महत्वाची बातमी
मुंबई : जर तुम्ही देखील पब्लिक टॉयलेटमध्ये हात धुतल्यानंतर हात सुखवण्याकरता हँड ड्रायरा वापर करता का? तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर असं करत असाल तर लगेच बंद करा... कारण यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे.
नुकतंच एका संशोधनात असं समोर आलं आहे की, हँड ड्रायर हे तुमचं हात सुकवण्याबरोबरच तुमच्या हाताला आणखी घाण करतात. अप्लायड एँड इन्वायरमेंटल मायक्रोबायोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात याचा खुलासा झाला आहे. हँड ड्रायरच्या समोर फक्त 30 सेकंद ठेवलेल्या प्लेटमध्ये जवळपास 18 ते 60 बॅक्टेरिया पाळले आहेत.
या अभ्यासात ऑथर्सने सांगितलं की, याद्वारे बॅक्टेरिया ज्यामध्ये पँथोजन आणि स्पोर्स सारख्या बॅक्टेरियांचा सहभाग असतो. हँड ड्रायरच्या खाली हात ठेवल्यामुळे ते जंतू तुमच्या हाताला चिकटतात.
टॉयलेटमधील दूषित हवा ड्रायरमुळे पसरते
यामध्ये असा देखील खुलासा झाला आहे की, ड्रायरच्या नॉजलजवळ खूप कमी बॅक्टेरिया असता. मात्र हे ड्रायर टॉयलेटमधील दूषित हवा जवळ घेतात. आणि मग ड्रायर ही हवा आपल्या हातावर पसरवतो. यामुळे असं म्हटलं जातं की, टॉयलेटच्या हवेत यूरिनचा वास येत असतो.