Heart Disease and Diabetes in Marathi: आजार ही कमकुवत शरीराची आणि वाईट जीवनशैलीची लक्षणे आहेत. वाढत्या वयानुसार ही समस्या गंभीर होत जाते. आजकाल वयाच्या 35 वर्षांनंतर मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका अचानक वाढतो. यानंतर, एकतर आयुष्य लवकर संपते किंवा आरोग्य समस्या घेऊन जगावे लागते. मधुमेह आणि कर्करोगासोबतच उच्च रक्तदाब, संसर्ग, फ्लू, सांधेदुखी, धाप लागणे, ऍलर्जी, सुरकुत्या, केस पांढरे होणे अशी  वृद्धापकाळाची लक्षणे कमी वयात दिसून येतात. यावर वेळीच काळजी घेतली नाहीतर आरोग्यासा गंभीर समस्यांना सामोरे जावं लागू शकतं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुमेह हा एक चयापचय विकार आहे ज्यामध्ये शरीर पुरेसे इंसुलिन तयार करत नाही. परिणामी, शरीरातील इन्सुलिन कमी झाल्यामुळे, साखरेची पातळी वाढू लागते ज्याचा परिणाम हळूहळू किडनी, त्वचा, हृदय, डोळे आणि व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर होतो. मात्र जर्नल ब्रेन, बिहेविअर आणि इम्युनिटीमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात म्हटले आहे की, तुम्ही जर निसर्गात पुरेसा वेळ घालवला तर हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी होतो. निसर्गाशी वारंवार संपर्क आल्याने सकारात्मकता वाढीला लागते. तुम्हाला चांगला आनंद मिळतो. चांगली झोप लागते आणि त्यांना तणाव कमी झाल्याचे दिसून आले. नुकतचं अभ्यासात आढळून आले की, निसर्गात पुरेसा वेळ घालवल्याने हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी होतो,  तसेच निसर्गात वेळ घालवल्याने त्यावेळेचा आनंद तुम्हाला मिळत असतो. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. याचा चांगला परिणाम दिसून येतो.


दरम्यान  नॉर्विच मेडिकल स्कूलच्या एका टीमच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, निसर्गाच्या संपर्कात राहिल्याने टाइप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब आणि मुदतपूर्व जन्म यांसारख्या परिस्थितींचे धोके कमी होऊ शकतात. तसेच अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या अभ्यासकाच्या टीमने म्हटले आहे की, निसर्गामुळे आरोग्य का सुधारू शकते याचे जैविक स्पष्टीकरण प्रदान करते. निसर्गातून आनंद मिळतो. त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.  अभ्यासासाठी टीमने 1244 लोकांना सहभागी करून घेतले होते. आरोग्यासाठी मूल्यांकनासाठी शारीरिक तपासणी, लघवीचा नमुना आणि उपाशीपोटी सकाळी रक्ताची तपासणी केली. त्यांच्यात चांगला परिणाम दिसून आला.