मुंबई : असंतुलित आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल बरेच लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. परंतु जर तुमचं वजन विनाकारण कमी होत असल्याचे तुमच्या लक्षात येत असेल तर ते तुमच्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते. असं होत असल्यास तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे. 


ताणतणाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल अनेकांनी आपली जीवनशैली अशी बनवलीये की काही चिंता त्यांना सतावत राहते ज्याचे रुपांतर हळूहळू नैराश्यात होतं. या तणावाचा चुकीचा परिणाम तुमच्या मनावर तर होतोच पण तुमच्या सवयींवरही होतो. तणावामुळे तुम्ही फक्त निराश आणि चिडचिड होत नाही तर तुमच्या झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या वेळेवरही परिणाम होतो. जे अचानक वजन कमी होण्याचं कारण असू शकतं.


सीओपीडीचा त्रास असलेली व्यक्ती


COPD, म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, हा फुफ्फुसाच्या आजारांपैकी एक आहे. ज्यामध्ये व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, हा आजार जसजसा वाढतो, तसतसं व्यक्तीचं वजन जास्त कमी होण्यासारखी लक्षणं देखील दिसू शकतात.


हार्मोनल असंतुलनामुळे 


तुमचं वजन अचानक कमी होण्यामागे हार्मोनल असंतुलन देखील असू शकतं. यामुळे तुम्हाला थकवा येणं, स्नायू कमकुवत होणं, अयोग्य आहार, रक्तदाबाशी संबंधित समस्या तसंच तुमचं वजन कमी होणं सुरू होतं.