उन्हाळ्याच्या दिवसात सनटॅनची समस्या टाळण्यासाठी खास घरगुती उपाय
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस असतात. या दिवसात मित्र मैत्रिणींसोबत आणि तुमच्या परिवारासोबत कुठे बाहेर फिरायला गेलात तर टॅन होण्याचा धोका अधिक असतो.
मुंंबई : उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस असतात. या दिवसात मित्र मैत्रिणींसोबत आणि तुमच्या परिवारासोबत कुठे बाहेर फिरायला गेलात तर टॅन होण्याचा धोका अधिक असतो.
तीव्र उन्हात बराच वेळ फिरल्याने सनबर्न होणं स्वाभाविकच आहे. मग टॅनिंग दूर करण्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्यानेही टॅनिंग दूर करता येऊ शकते. .सनबर्नपासून सुटका मिळवण्याचे 5 सोपे उपाय!
उन्हात फिरल्याने त्वचेचे नुकसान
सतत उन्हात फिरल्याने टॅनिंग होते. सोबतच त्वचा लालसर होणं, रॅशेस येणे ही समस्या वाढते. रात्री झोपण्यापूर्वी काही घरगुती उपाय केल्यास सकाळी त्वचेच्या काही समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !
काय आहेत नैसर्गिक उपाय?
काकडी आणि दूधी भोपळा
काकडी आणि दूधी भोपळ्याला सालीसकट खिसून घ्या. दोन्हींना एकत्र एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी त्याने चेहरा स्वच्छ करा. नियमित हा उपाय केल्याने चेहर्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहर्याला नाईट क्रीम लावून झोपा.
तांदूळ आणि संत्र
रात्रभर तांदूळ भिजत ठेवा. सकाळी तांदळाची पेस्ट करा. यामध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या संत्राच्या सालींची पेस्ट करून मिसळा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी लावा. 10 मिनिटांनी चेहरा स्क्रब करा.