Sumo Wrestlers : सुमो पैलवानांची कुस्ती ही जपान आणि ईशान्य आशियामध्ये प्रसिद्ध आहे. भारतात देखील काही ठिकाणी ही कुस्ती पाहण्याची संधी मिळते. सर्वांना लहानपणापासून सुमो पैलवानाचं कुतूहल असतं. या पठ्ठ्यांचं वजन एवढं वाढतं तरी कसं?, असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला असावा. सुमो पैलवान होणं म्हणजे फक्त खायचा विषय नाही. त्याला मेहनत देखील तेवढीच घ्यावी लागते. (sumo wrestler real life Sumo Wrestlers Diet and Workout)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमो पैलवानाचं वजन साधारण 150 ते 300 किलोच्या आसपास असतं. साधारण फॅटी माणसांना आरोग्याच्या निगडीत समस्या जाणवतात. मात्र, सुमो  पैलवानांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. सुमो पैलवानांना फॅटी लिव्हरचा त्रास होताना दिसत नाही. कारण त्यांचं अतिरिक्त फॅक्ट हे त्वचेच्या खाली जमा होतं.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुमो पैलवान आरोग्याच्या (sumo wrestlers Health) बाबतीत निरोगी असतात. त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी कसतो. त्याचबरोबर त्यांचं हृदय देखील निरोगी असते. त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. त्याचबरोबर त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता देखील कमी असते.


सुमो पैलवानांची ट्रेनिंग (sumo wrestlers exercise) आणि डाएट एवढा स्ट्रिक्ट असतो की लहानपणापासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष दिलं जातं. त्यानंतर कुठे मोठे झाल्यावर ते सुमो पैलवान होतात. त्यांना फक्त जेवणावरच नाही तर व्यायामावर देखील भरपूर लक्ष द्यावं लागतं.



जपानमधील (Japan Sumo) सुमोच्या ट्रेनिंग सेंटरवर पहाटेपासून ट्रेनिंग सुरू असते. सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेली ट्रेनिंग पुर्ण 5 तास चालते. यावेळी त्यांना आरोग्याच्या संबंधीत ट्रेनिंग दिली जाते. तर शरिर ठिसून न राहता काटक व्यावं, यासाठी देखील प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर त्यांना पाच वर्षांची प्रोफेशनल ट्रेनिंग देखील दिली जाते.



दरम्यान, सुमो पैलवानांच्या बाबतीत सांगितलं जातं की, ते दिवसातून फक्त 2 वेळा जेवण करतात. एकावेळी एक सुमो 4 लोकांचं जेवण खातो. ज्यामध्ये सुशी आणि तेलकट पदार्थांचा समावेश असतो. तसेच, वेगवेगळ्या भाज्या ज्यामध्ये बोक चोय, डाइकॉन, मशरूम यांसारख्या भाज्या आहेत.