Heart Attack Symptoms in Women: हृदयविकारामुळं होणारे मृत्यू ही चिंता वाढवणारी बातमी आहे. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा धोका असल्याचे अनेक अभ्यासात नोंदवले आहे. मात्र, आता हाती आलेल्या अभ्यासानुसार, पुरुषांबरोबरच महिलांनाही हृदयविकाराचा धोका असल्याचे समोर आले आहे. जागतिक स्तरावर चारपैकी एका महिलेचा मृत्यू हृदयविकारामुळं होतो. याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अति ताण, तणावग्रस्त आयुष्य, झोपेचा अभाव, वेळी-अवेळी जेवण, बदललेली जीवनशैली आणि जंक फुड यामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो. शरीरात कोलेस्टॉलची पातळी वाढल्यानेही हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी काय उपाय करावे व लक्षणे कोणती. तसंच, महिलांना हृदयविकार होण्याची कारणे कोणती हे सर्व जाणून घ्या. 


महिलांना हृदयविकार होण्याची कारणे?


मधुमेह, धुम्रपान, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी याशिवाय इतरही घटक महिलांच्या हृदयविकारास कारणीभूत ठरतात. रजोनिवृत्तीदरम्यान किंवा गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करुन इस्ट्रोजनच्या पातळीतील बदलांमुळं हार्मोनल बदल हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. 


गरोदर असताना रक्तदाबाचा त्रास बळावणे आणि गर्भावस्थेतील मधुमेह यांसारख्या समस्यांमुळं महिलांना बाळंतणानंतर हृदयविकाराची शक्यता वाढते. 


हल्ली मुलींमध्ये व महिलांमध्ये पीसीओएस पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजार वाढत आहे. यामुळं प्रजनन समस्या, अनियमित पाळी, वजन वाढणे यासारख्या समस्या होतात. त्याचाच परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. तसंच, कॅल्शियमच्या कमतरतेमुळंही महिलांना हृदयविकाराचा धोका संभवतो. 


हृदयविकाराची लक्षणे ओळखा


छातीत वेदना होणे हे हृदयविकाराचे प्रमुख लक्षणे आहे. तर महिलांमध्ये गळा, पाठ, खांदा, जबडा, पोटात दुखणे, दम लागणे, थकवा, घाम येणे अशी लक्षणे दिसतात. 


हार्ट अॅटेक रोखण्यासाठी काय करावं


नियमित व्यायाम करणे
निरोगी जीवनशैली
वजन नियंत्रणात ठेवणे
मद्यपान, धुम्रपान न करणे
नियमित आरोग्य तपासणी


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)