तुमच्या पोटातच नाही तर नसांमध्येही भरतोय गॅस; शरीर करतंय अलर्ट
आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की, तुमच्या नसांमध्ये गॅस जमा झालाय.
मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना गॅसच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यांच्यामुळे अशा त्रासांना सामोरं जावं लागतं. पोटात गॅस झाला की घरगुती उपाय करू त्यावर आराम मिळवता येतो. मात्र तुम्हाला माहितीये का? तुमच्या शरीरातील नसांमध्येही गॅस जमा होतो. याला वैद्यकीय परिभाषेत एअर एम्बोलिझम म्हणतात. या समस्येचा प्रभाव रक्तभिसरणावरही होतो.
आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की, तुमच्या नसांमध्ये गॅस जमा झालाय. जाणून घेऊया ही लक्षणं...
सूज येणं
जर तुमच्या नसांमध्ये गॅस भरला असेल तर तुमच्या हाता पायांना सूज येऊ शकते. ज्यावेळी नसांमध्ये गॅस भरतो, तेव्हा रक्त आणि ऑक्सिजनच्या अभिसरणावर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे शरीराच्या काही भागांना सूज येऊ शकते. या दरम्यान, यामुळे तुमचे पाय दुखू शकतात.
सांधेदुखी
नसांमध्ये गॅस जमा झाला की गुडघा आणि सांधे यांच्यामध्ये बुडबुडे तयार होतात. परिणामी यामुळे एक प्रकारचा हवेचा दाब तयार होतो, ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत अनेकदा हाडांमधून आवाजही येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
श्वास घेण्यास त्रास होणं
जर तुमच्या नसांमध्ये गॅस जमा झाला असेल तर छातीमध्ये ब्लॉकेजची स्थिती निर्माण होते. याचा थेट परिणाम रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनच्या अभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. एकंदरीत यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. काही वेळा नसांमध्ये गॅस भरल्यामुळे छातीत जडपणा जाणवू शकतो. अशावेळी डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.