मुंबई : आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करत असते. आपल्या शरीरात दोन किडन्या असतात. त्यातील एक निकामी झाल्यास दुसरीवर शरीराचे कार्य चालते. पण थोडे कठीण होते. पण किडनीचा त्रासाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर उपाययोजना करता येतील. किडनी खराब होऊ लागल्यास शरीर हे संकेत देण्यास सुरुवात करते. पाहुया कोणती आहेत ती लक्षणे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# पोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला असहनीय दुखत असल्यास त्याकडे गंभीरपणे लक्ष द्या. हा किडनीच्या त्रासाचा संकेत असू शकतो.


# किडनी खराब झाल्यावर शरीरात हानिकारक पदार्थ जमा होऊ लागतात. त्यामुळे हाता-पायाला सूज येऊ लागते. त्याचबरोबर लघवीचा रंग देखील डार्क होऊ लागतो. हा रंगातील बदल किडनी समस्येचे लक्षण आहे.


# लघवी करताना रक्त पडल्यास याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. तात्काळ युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.


# अचानक अनेकदा लघवी येत असल्यास हा किडनी समस्येचा इशारा आहे. त्यामुळे सारखी लघवीला का येते, याचे कारण तपासून पहा. लघवी कमी किंवा जास्त होणे, हे दोन्हीही प्रकार शरीरासाठी घातक आहेत.


# लघवी आल्यासारखे वाटते, मात्र होत नाही. असा अनुभव आल्यास हा किडनी खराब होण्याचा संकेत आहे.


# लघवी करताना जळजळ होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास हा युरीन इन्फेक्शनचा संकेत आहे किंवा किडनीची काहीतरी समस्या आहे. यासाठी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


# लहान सहान कामे केल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हा हार्मोन्सचे असंतुलन किंवा किडनी फेलचे लक्षण आहे.