SKINCARE IN MONSOON:   पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असत..हवेत आद्रता असते दमटपणा असतो त्याचा परिणाम केसांसोबत त्वचेवर होतो .पावसाळ्यात असणाऱ्या दमटपणामुळे चेहऱ्यावरील ऑइल ग्रंथी सक्रिय होतात आणि पिंपल्स ची समस्या होते किंवा चेहरा निस्तेज होऊ लागतो एक वेळ पिंपल्स जातीलही मात्र त्याचे डाग सहजासहजी जात नाहीत  त्यामुळे पावसात त्वचेसंदर्भात विशेष सतर्क असं खूप गरजेचं आहे यासाठी पार्लर्समध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची देखील गरज नाहीये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धती  वापरून आपण घरगुती फेसपॅक बनवू शकता आणि त्याचा उपयोग करून सुंदर त्वचा मिळवू शकता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला जाणून घेऊया कसे बनवायचे हे होममेड फेसपॅक



टोमॅटो फेसपॅक 



टोमॅटो ज्यूस  मध्ये एक चमचा बेसन ,एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर,अर्धा चमचा लिंबाचा रस आणि कच्च दूध घालून हे मिश्रण चांगलं एकत्र करावं आणि मग चेहरा आणि मानेवर लावावे पंधरा मिनिट ठेवून मग चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करावा 
 


टोमॅटो आणि ओट्स फेसपॅक 



एक टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यात ओट्स आणि दही मिसळा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आता चेहरा आणि मानेवर लावा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या 



कोरफड फेसपॅक


एक चमचा एलोवेरा जेल घ्या यात लिंबाचा रस घाला या मिश्रणाला चान्गल्या प्रकारे फेटा हा पाक चेहरा आणि मानेवर लावा पंधरा मिनिटांनी धुवा 



कोरफड आणि लिंबाचा फेसपॅक 


 


कडुनिंबाचा पाला स्वछ धुवून घ्या त्यात कोरफडीचा गर किंवा जेल घाला थोडं पाणी घाला आणि आता हि पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा दहा मिनिट ठेवून स्वच्छ करू शकता.


 


मलाई आणि हळदीचा पॅक 



एक चमचा दुधावरची साय घेऊन त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि तयार फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा १० मिनिटांनी स्वच्छ धुवा यांनतर मॉइस्चराइझर लावायला विसरू नका