मुंबई : कोरोनाच्या काळात मास्क सक्ती करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही मास्कबंदी हटवण्यात आली. सध्या पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत असून अशा परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयानुसार, विमानतळ आणि विमानात मास्कशी संबंधित नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई केली आहे. शुक्रवारी, न्यायालयाने खटल्याची सुनावणी करताना सांगितलंय की, विमानतळ आणि विमानात मास्क न घातल्याबद्दल प्रवाशांना 'नो फ्लाइंग'च्या यादीत समाविष्ट करावं.


विमान प्रवासात आता मास्कची सक्ती केली जाणार आहे. देशात कोरोनाची संख्या वाढत असताना विमान प्रवासात आणि विमानतळ परिसरात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिलेत.


विना मास्क विमानप्रवाशांवर दंडात्मक कारवाई करा प्रसंगी प्रवाशांना विमानातून खाली उतरवा असे निर्देश दिल्ली हायकोर्टानं विमान कंपन्यांना दिलेत.


कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने विमानतळ आणि विमानांमध्ये मास्कच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. विमानतळावर आणि विमानात मास्क न घालणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्यात यावा, असं न्यायालयाने म्हटलंय. यासोबतच न्यायालयाने DGCA ला विमानतळ आणि विमानातील कर्मचार्‍यांवर नियम न पाळल्याबद्दल प्रवाशांसह इतरांवर कारवाई करण्यास सांगितलंय.