गरोदर स्त्रियांंनी पेनकिलर्स घेतल्यास बाळावर होतो `हा` गंभीर परिणाम ...
गरोदरपणाचा काळ हा खूपच नाजूक असतो. या दिवसांमध्ये आहाराचं पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच तुम्ही घेत असलेल्या औषधांकडेही लक्ष ठेवणं गरजेचे आहे. पेनकिलर्स गरोदर स्त्रिया आणि गर्भावर दुष्परिणाम करतात असा दावा एका संशोधनातून पुढे आला आहे.
लंडन: गरोदरपणाचा काळ हा खूपच नाजूक असतो. या दिवसांमध्ये आहाराचं पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच तुम्ही घेत असलेल्या औषधांकडेही लक्ष ठेवणं गरजेचे आहे. पेनकिलर्स गरोदर स्त्रिया आणि गर्भावर दुष्परिणाम करतात असा दावा एका संशोधनातून पुढे आला आहे.
वेदनाशामक गोळ्या आरोग्याला त्रासदायक
एका संशोधनानुसार, इबुप्रोफेन आणि पॅरासिटॅमोल गर्भाच्या वाढीसाठी त्रासदायक ठरते. यामुळे नवजात बाळामध्ये नपुंसकता वाढू शकते. सोबतच तरूणींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करते.
पेनकिलर नवजात बाळामध्ये विकलांगता निर्माण करतो. महिलांमधील मेनोपॉजचा त्रास वाढवतो. वेदनाशामक गोळ्यांमुळे अंडाशयातील अंड्यांची निर्मिती वाढते. जेव्हा अंडाशय रिकामे होते तेव्हा मेनोपॉजचा धोका बळावतो.
दर तीन महिलांमागे एकजण घेते पेनकिलर
ब्रिटनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, गरोदर महिलांनी पेनकिलर्सचे सेवन टाळावे. अशा गोळ्यांचे सेवन डीएनवर परिणाम करतात. पॅरासिटॅमोलमुळे सुमारे 40 % अंड्याची निर्मिती कमी होते.
यकृत आणि किडनीवर परिणाम
किडनी आणि यकृतावरही पेनकिलरचा परिणाम होतो. वारंवार पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्याने यकृताचे आरोग्य बिघडते. 2006-2015 या दरम्यान युरोपियन देशात फ्रान्स हा पेनकिलरचा सर्वाधिक वापर करणारा देश ठरला होता. आठवड्याला केवळ 4000 मिलिग्राम पेनकिलर घेण्याचा सल्ला दिला जातो.