सेल्फी काढणे हा मानसिक आजार?
आजकाल आपण पाहतो की तरूणाईला सेल्फीची भलतीच क्रेझ आहे.
लंडन : आजकाल आपण पाहतो की तरूणाईला सेल्फीची भलतीच क्रेझ आहे. त्यामुळे अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. मात्र सेल्फीचे वेड अजून एका प्रकारे धोकादायक ठरेल.
सेल्फी काढणे हा मानसिक विकार
सातत्याने सेल्फी काढणे हा एक धोका असून त्यावर इलाज होणे गरजेचे आहे. ब्रिटनच्या नॉटिंघम ट्रेंट विश्वविद्यालय आणि तामिळनाडूतील त्यागराज स्कूल ऑफ मॅनेजमेंटने २०१४ मध्ये ही बातमी दिली होती. त्यानंतर यावर संशोधन सुरू झाले. अमेरिकन साइकिएट्रिक असोशियनने देखील सेल्फी काढणे हा मानसिक विकार असल्याचे सांगितले.
भारतात सेल्फी घेताना अधिक मृत्यू
आता त्यांनी या आजाराची पुष्टी केली आहे. आणि याची गंभीरता लक्षात येण्यासाठी त्यांनी एक प्रयोग योजला आहे. यात २००-२०० लोकांचे दोन गट तयार केले जातील. त्यांच्यावर अभ्यास करण्यात आले. हे अध्ययन भारतात करण्यात आले कारण भारतात फेसबुक युजर्स अधिक आहेत.
भारतात धोक्याच्या ठिकाणांवर सेल्फी घेताना अधिक मृत्यू झाले आहेत. इंटरनेशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड अॅडिक्शन प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार या विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांची तीन स्तरात विभागणी करण्यात आली आहे.