Tea With Bread: चहासोबत ब्रेड खाताय? `ही` 5 संकटं तुमच्यापासून दूर नाहीत....
Tea With Bread: भारतात चहा हे जवळपास अनेकांच्या आवडीचं पेय. फक्त चहाच नाही, तर चहासोबत खाल्ले जाणारे पदार्थही जवळपास एकसारखे. यामध्ये अनेकजण चहासोबत ब्रेड, त्यावर (Butter) बटर- लोणी, साखर (Sugar) लावून खाण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात?
Tea With Bread: भारतात जवळपास अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या दिवसाची सुरुवात ही चहाच्या प्याल्याने होते. बरं, नुसता चहा नाही, तर या चहाला जोड असते ती म्हणजे ब्रेड, बिस्कीट किंवा तत्सम पदार्थांची. यातही आम्हाला रोज चहा आणि ब्रेड बटर दिलं तरी त्यावर जगू असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? पोट भरत असलं, तरी ही सवय आरोग्यासाठी (Health news) चांगली नाही.
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी (High Blood Pressure) चहा आणि ब्रेड- बटर कधीही खाऊ नये. असं केल्यास तुमचा त्रास आखी बळावेल. चहासोबत ब्रेड खाल्ल्यास पोटातील अल्सर (Peptic Ulcer) चा त्रास होतो. त्यामुळे हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका. असं केल्यास अनेकांना अॅसिडीटीचा त्रासही सतावतो.
चहासोबत ब्रेड खाण्याच्या सवयीमुळे स्थुलताही (obesity) अतिशय झपाट्याने वाढते. सफेद ब्रेडमध्ये प्रिजर्विटिव्स मिसळलेले असतात. ब्रेड खूप दिवस टिकण्यासाठी या प्रक्रिया केल्या जातात. पण, आरोग्यासाठी ही सवय चांगली नाही. यामुळं पोट बिघडण्याची दाट शक्यता असते.
अधिक वाचा : एक्सरसाईज करण्यासापूर्वी 'या' गोष्टींची जरूर काळजी घ्या, अन्यथा...!
चहा आणि ब्रेड खाल्ल्यामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्यामुळं अनेकांना हृदयरोग उदभवू शकतात. मधुमेह (Diabetic Patient) असणाऱ्यांनी तर चहा आणि ब्रेडपासून चार हात दूर राहिलेलंच बरं. कारण, औषधं सुरु असताना त्यांनी या पदार्थांचं सेवन केल्यास इंसुलिन (Insulin) वर वाईट परिणाम होऊन रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढतं.
(वरील माहितीस सामान्य उदाहरणांतून घेण्यात आली आहे. कोणताही निर्णय गेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )