Belly Fat : अगदी बोटांवर मोजण्या इतकी लोकं असतील ज्यांना चहा ( Tea ) आवडत नसावा. जवळपास 99 टक्के लोकांना चहा आवडतो. मात्र तुम्हाला माहितीये का, तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पीत असलेला हा चहा तुमचं वजन वाढवतोय. जर तुम्हाला वजन किंवा बेली फॅट ( Belly Fat ) कमी करायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट तुमच्या चहाच्या कपवर लक्ष ठेवा. कदाचित हीच गोष्ट तुम्हाला पोटाची चरबी कमी होऊ देत नाही.


चहा आणि वजनाचा ( Tea increase belly fat  ) नेमका संबंध काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचं बेली फॅट वाढलं असेल तर त्याला तुमचा सकाळचा चहा कारणीभूत असू शकतो. पोटाची चरबी वाढवण्यात सर्वात अधिक कारणीभूत असलेला चहा म्हणजे दुधाचा चहा. याशिवाय चहामुळे निद्रानाश, चिंता, बद्धकोष्ठता, पिंपल्स या समस्या देखील उद्भवू शकतात. आपण पाहिलं तर एक कर दुधाच्या चहामध्ये जवळपास 126 कॅलरीज असतात. 


चहा प्यायल्याने कसं वाढतं बेली फॅट?


ब्लॅक टी ( Black Tea ) किंवा ग्रीन टी ( Green Tea ) प्यायल्यानंतर बेली फॅट वाढत नाही. मात्र चहा बनवताना त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या गोष्टींमुळे तुमच्या पोटाचा घेर वाढू लागतो. चहा बनवताना अनेकजण त्यामध्ये फूल क्रिम मिल्क, साखर ( Sugar ) यांचा समावेश करतात. साखर आणि क्रिम मिल्कमुळे तुमच्या शरीरातील फॅट्स ( Body Fats ) वाढू लागतात. 


चहा पिण्याची योग्य पद्धत कोणती?


ज्यावेळी तुम्ही चहा बनवता तेव्हा त्यामध्ये फूल क्रिम मिल्कपेक्षा टोन्ड मिल्क वापरणं फायदेशीर ठरेल, जेणेकरून त्यातील फॅट्स कमी होतील. तसंच साखरेमुळे देखील आपल्या वजनात वाढ होते. त्यामुळे साखरेचा चहा पिण्यापेक्षा तुम्ही साखर न घातलेला चहा तुमचं वजन वाढवणार नाही. 


अजून एका गोष्टीने वजन वाढत ते म्हणजे, चहासोबत खाल्ला जाणाऱ्या गोष्टींनी. अनेकजण चहा पिताना त्याच्यासोबत फरसाण किंवा बिस्किट खाणं पसंत करतात. मात्र या पदार्थांमुळे तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे चहासोबत या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)