How to Recognize and Cure Cancer Testicular Cancer : कर्करोग म्हणजे कन्सर याचा धोका जसा महिलांना आहे तसाच तो पुरुषांनाही तेवढ्याच आहे. या जीवघेणा कर्करोगामुळे पुरुष नपुंसकही होऊ शकतात. हा कन्सर हा अंडाशयाचा म्हणजेच टेस्टिक्युलर कॅन्सर. हा आजारा धोका 15- 45 वयोगटातील पुरुषांना सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरने झपाट्याने पाय पसरवले आहेत. या आजारीची लक्षणं ताबडतोब दिसतात त्यामुळे हा आजार टाळता येऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या कॅन्सरची लक्षणं याशिवाय हा कॅन्सर आपल्याला विळखा घालायला नको म्हणून पुरुषांनी त्यांचा लाइफस्टाइलमध्ये काही बदल केल्यास ते निरोगी राहू शकतात. 


टेस्टिक्युलर कॅन्सर हा अतिशय घातक आणि जीवघेणा असल्याने पुरुषांमध्ये याबद्दल खूप भीती आहे. पण हा आजार टाळण्यासारखा आहे. जर तुम्ही वेळीच लक्ष दिलं आणि योग ती काळजी घेतली तर. या कॅन्सरचेही अनेक प्रकार आहेत. या कॅन्सरमध्ये अंडाशयात कर्करोगाचे जंतू विकसीत होतात. मग या दरम्यान साधारण लघवीला त्रास होणे, अंडाशयात गाठ जाणवणे, टेस्टिक्युलरवर सूज येणे, ओटी पोटात दुखणे, पाठदुखी, अंककोषात ढेकूळ निर्माण होणे, अंडकोषात जडपणा जाणवणे आणि वारंवार खोकला होणे ही लक्षणं दिसून येतात. (testicular cancer men Impotent People aged 15-45 are at higher risk  early sign how to recognize and change lifestyle)


टेस्टिक्युलर कर्करोगाची कारणं 


तज्ज्ञांच्या नुसार पुरुषांना सर्वाधिक टेस्टिक्युलर कर्करोग का होतो यांचं नेमकं कारणं अद्याप समोर आलेलं नाही. पण त्यावर संशोधन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण कुटुंबात हा आजार कोणाला झाला असेल तर पुढील पिढीला याचा धोका असतो. अशावेळी मुलगा जन्माला आल्यास त्याची विशेष काळजी घ्यायला हवी असं तज्ज्ञ सांगतात. 


'या' 5 मिनिटांच्या चाचणीद्वारे ओळखा आजार


घरच्या घरी पाच मिनिटांच्या चाचणीद्वारे तुम्ही हा आजार ओळखू शकता, असं तज्ज्ञांचं मत आहे. ते म्हणतात की, आंघोळ करताना एक छोटीशी चाचणीद्वारे तुम्ही या कॅन्सरचं निदान करु शकता. आंघोळ करताना अंडाशयावर कोमट पाणी टाका. त्यानंतर दोन्ही अंडकोषाचे गोळे हळूहळू फिरवून त्यावर सूज, गाठ, किंवा ढेकून किंवा काही विकृती दिसतेय का ते तपासा. हे लक्षात ठेवा की, टेस्टिक्युलरमधील गाठीला वेदना नसतात. त्यामुळे असं काही आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. 


'ही' काळजी घ्या


1. जर तुम्ही खेळाडू असाल तर अंडकोषांना इजा होणार याची काळजी घ्या. खेळताना गार्डचा वापर करा. 


2. एचआयव्ही संसर्गामुळे टेस्टिक्युलर कॅन्सरचा धोका अधिक असतो म्हणून यासंबंधित गोष्टींपासून दूर राहा. 


3. उन्हाळ्यात अंडाशयाची विशेष काळजी घ्या. 



 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)