मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वाढचा धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला. फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या बूस्टर डोसबाबत सरकार मोठा विचार करतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकार आता मिक्स डोसचा बुस्टर डोस देण्यावर सरकार विचार करतं असल्याचं समोर आलं आहे. लवकरच अभ्यास करून याबाबत निष्कर्ष काढणार असल्याची देखील चर्चा आहे. 


यानुसार आता ज्या व्यक्तींनी कोविशील्डचे पहिले डोन डोस घेतले आहेत ते कोव्हॅक्सीनसाठी पात्र ठरू शकतात. तर ज्यांनी कोव्हॅक्सीनचा डोस घेतलाय ते कोव्हिशील्डसाठी पात्र ठरू शकतात. लसीचा मिक्स डोस दिल्यास परिणामकारक ठरू शकतो याबाबत सध्या विचार सुरू आहे. 



नोवोवॅक्स कंपनीने बनविलेली सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित होणारी कोव्होवॅक्स ही लस तसंच भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्याच्या डोसचाही विचार प्रिकॉशन म्हणजेच बूस्टर डोससाठी होऊ शकतो. 


बूस्टर डोसमध्ये किती अंतर असावं?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. दरम्यान कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असू शकतं. दुसरा डोस आणि बुस्टर डोसमधील अंतर ठरवण्याबाबत लवकरच राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार संस्थेमार्फत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.


भारताच्या लसीकरण कार्यक्रमात सध्या वापरल्या जाणार्‍या Covishield आणि Covaxin या लसींच्या अंतराच्या तपशीलाची चर्चा केली जात आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.