मुंबई : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), एम्स (एम्स) आणि नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्रीने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचं मूल्यांकन केलं आहे. यानंतर या दोन्ही लाटांमध्ये काही मोठे फरक असल्याचं समोर आलं आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये हे सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे मूल्यांकन 18,961 रूग्णांवर केले गेले, त्यापैकी पहिल्या लाटेतील 12059 रूग्ण आणि दुसर्‍या लाटेतील 6903 रुग्ण होते.


दुसऱ्या लाटेत संक्रमित पुरुषांच्या संख्येत घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसर्‍या लाटेत संक्रमित झालेल्या लोकांचं सरासरी वय हे पहिल्या लाटेत बाधित झालेल्या रूग्णांच्या तुलनेत कमी होतं. दुसऱ्या लाटेत 48.7 वर्षे वयाच्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं तर पहिल्या लाटेतील लोकांचं वय सुमारे 51 वर्ष होतं. दरम्यान दोन्ही लाटांमधील 70% रुग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तर दुसऱ्या लाटेत पुरुषांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा काहीशी कमी होती. दुसर्‍या लाटेत 63.7% पुरुष बाधित झाले, तर पहिल्या लाटेमध्ये 65.4% पुरुष कोरोनाची बाधा झाली होती.


  • दुसऱ्या लाटेत 49 टक्के रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. तर पहिल्या लाटेमध्ये 43 टक्के रूग्णांना या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. 

  • दुसऱ्या लाटेत 13% म्हणजे 1422 रूग्णांना एक्यूट रेस्पिरेट्री डिस्ट्रेस सिंड्रोमला सामोरं जावं लागलं. तर पहिल्या लाटेत ही रूग्णसंख्या 880 होती. 

  • दुसऱ्या लाटेत 50% रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. तर हेच प्रमाण पहिल्या लाटेत 42.7 टक्के होतं.

  • व्हेटिंलेटरची गरज दुसऱ्या लाटेत 16 टक्के रूग्णांना लागली आणि पहिल्या लाटेत 11 टक्के लोकांना याची गरज भासली


दुसऱ्या लाटेचा फटका तरूणांना जास्त बसताना दिसला. दुसऱ्या लाटेत 20 ते 39 वयोगटातील 26.5% तरूण कोरोना बाधित झाले. तर पहिल्या लाटेमध्ये 23.7% तरूणांना कोरोनाची बाधा झाली होती. दुसऱ्या लाटेत 36 टक्के महिला तर पहिल्या लाटेत 34.5 टक्के महिलांना संक्रमण झाल्याचं समोर आलं होतं.