मुंबई : लैंगिक संबंध हा जीवन चक्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु हे आपल्या आरोग्याशी देखील खूप संबंधित आहे. काही लोक विविध कारणांमुळे लैंगिक संबंध थांबवतात. मात्र याचा शरीरावर काही परिणाम होण्यास सुरू होतो. बराच काळ शारीरिक संबंध न ठेवल्याने तुमच्या शरीरावर होणारे काही नकारात्मक परिणाम जाणून घेऊया.


रोगांशी लढण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक प्रकरणांमध्ये हे सिद्ध झालं आहे की, सेक्स केल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. जरी हस्तमैथुन केल्याने फायदा होतो, परंतु पूर्ण लैंगिक क्रियाकलाप सक्रियपणे संसर्ग आणि रोगाशी लढण्यास मदत करतात.


हार्मोन्सवर परिणाम


जरी तुम्ही नियमित वर्कआऊट करत नसाल, तर लैंगिक संबंधांद्वारे केल्याने तुमचं शरीर निरोगी राहतं. असं न केल्यास तुमच्या स्नायूंवर आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो.


ताणतणावात वाढ


तणाव कमी करण्यात लैंगिक संबंध मोठी भूमिका बजावतं. जास्त ताण रक्तदाब वाढवतो आणि समस्या निर्माण करतो. 


पुरुषांना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका


नियमित सेक्सचा पुरुषांच्या लैंगिक अवयवावर सकारात्मक परिणाम होतो. ज्या व्यक्ती नियमितपणे सेक्स करतात त्यांच्या तुलनेत सेक्स न करणाऱ्या व्यक्तींना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका अधिक असतो.


लैंगिक इच्छेवर वाईट परिणाम


काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, नियमित सेक्स केल्याने तुमची लैंगिक इच्छा प्रबळ राहते. असं मानलं जातं की, जर तुम्ही त्यापासून दूर राहिलात तर सेक्सची इच्छा देखील कमी होईल.