मुंबई : मंकीपॉक्सचा संसर्ह आता सुमारे 20 देशांमध्ये पसरलायय. त्यामुळे सर्व आरोग्य संस्था चिंतेत आहेत. या व्हायरसबाबत संशोधन करत उपचार काय आहेत आणि चाचणीद्वारे तो सहजपणे कसा शोधला जाऊ शकतो हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर नुकतंच द लॅन्सेट जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालानुसार, मंकीपॉक्सचा व्हायरस रक्त तपासणी आणि घशातील स्वॅब चाचणीद्वारे शोधला जाऊ शकतो. याशिवाय या अहवालात मंकीपॉक्स व्हायरस शोधण्याबाबतही अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.


द लॅन्सेट अभ्यासाच्या अहवालात असं नमूद करण्यात आलं होती की, मंकीपॉक्सचा व्हायरस रक्त आणि घशातील स्वॅबद्वारे शोधला जाऊ शकतो. याशिवाय, काही अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स विषाणूवर काम करू शकतात असा दावा या अभ्यासात करण्यात आलाय.


मंकीपॉक्सचा व्हायरस रक्तात आणि लाळेतही आढळून आल्याचं संशोधनात आढळून आले आहे. मात्र, याआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर मंकीपॉक्स कधीच पसरला नसल्याचा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. पण तरीही त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. 


द लॅन्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2018 ते 2021 दरम्यान ब्रिटनमध्ये दुर्मिळ व्हायरसने ग्रस्त असलेल्या सात रुग्णांच्या गोष्टी समोर आल्या आहेत. या अभ्यासात व्हायरसच्या उपचारांसाठी दोन अँटीव्हायरल औषधं - ब्रिन्सिडोफोव्हिर आणि टेकोविरिमेट यांच्या पहिल्या ऑफ-लेबल वापरासाठी रुग्णाच्या प्रतिसादाचा शोध घेण्यात आला.