मुंबई : देशात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना, कोरोनाने पुन्हा भयावह स्थिती निर्माण केली आहे. दिल्ली आणि मुंबई महानगरांमध्ये दररोज कोरोनाची प्रकरणं वाढतायत. शनिवारी मुंबईत कोरोनाचे 2000 नवे रुग्ण आढळले, तर दिल्लीत 1500 हून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळलेत. मुंबईत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र सध्या कोरोनाचे केंद्रबिंदू बनताना दिसतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आदल्या दिवसाच्या तुलनेत दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे.


मुंबईत नव्या रुग्णांची संख्या 2000 च्या पार


शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 3883 नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत कोरोनाचे 2054 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी शुक्रवारी महाराष्ट्रात 4165 नवे रुग्ण आढळले होते. तर मुंबईत 2255 रूग्णांची नोंद करण्यात आली होती.


देशासह राज्याच्या मागे लागलेली कोरोना थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होतेय. तसंच दररोज काहींचा मृत्यूही होतोय. तर सातत्याने मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित सापडतायत. त्यामुळे कुठेतरी राज्यावर कोरोना निर्बंध लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.