Erectile Dysfunction: आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या त्रास देतायत. यामध्ये तरूणांना देखील अनेक तक्रारी उद्भवताना दिसतायत. धकाधकीच्या जीवनामुळे आणि बैठी जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या अधिक दिसून येतेय. या समस्येशी झुंजणाऱ्या व्यक्ती संकोचामुळे कोणाशीही बोलू शकत नाहीयेत. हा त्रास सतत होत राहिल्याने मानसिक अस्थिरता वाढू लागते. मुख्य म्हणजे याचा वैवाहिक जीवनावरही परिणाम होतो. मुंबईच्या रूग्णालयातील एका धक्कादायक आकडेवारीनुसार, हे समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायर हॉस्पिटलच्या एंड्रोलॉजी विभागाचे डॉ. प्रियांक कोठारी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या पौरुषत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून, इरेक्टाइल डिसफंक्शनने ग्रस्त असलेल्या 10 पैकी फक्त 2 लोक त्यांची समस्या त्यांच्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांशी शेअर करू शकतात.


इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे नेमकं काय?


इरेक्टाइल डिसफंक्शन हा लैंगिक समस्या आहे. यामध्ये एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंधादरम्यान इरेक्शन होण्यास किंवा ते टिकवून ठेवण्यात अडचण येऊ लागते. या परिस्थितीतला 'इरेक्टाइल डिसफंक्शन' असं म्हणतात. शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे इरेक्शन समस्या उद्भवू शकते. शिवाय इरेक्शन समस्या लॉन्ग टर्म किंवा शॉर्ट टर्म देखील असू शकते.


कशामुळे वाढतेय तरूणांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या?


आजकाल प्रत्येकाचं जीवन हे बिझी झालं आहे. यामध्ये तणाव आणि बैठी जीवनशैली यामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या वाढताना दिसतेय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरुष त्यांच्या समस्या कोणाशीही शेअर करत नाहीत. याचं कारण म्हणजे, त्यांच्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल याची त्यांना भीती असते. याच कारणामुळे पुरुष तणावात राहतात आणि या सगळ्याचा परिणाम भावनिक आणि मानसिक अस्थिरतेवर होऊ लागतो. इतकंच नव्हे तर वैवाहिक जीवनात फूट पडते. 


पुरुषांची ही समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणेऔषधं आणि पेनाईल इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे पुरुषार्थ वाचवण्यासाठी नायर हॉस्पिटलचे ॲन्ड्रोलॉजीचे डॉक्टर काम करतायत.


नायर रूग्णालयात गेल्या 3 वर्षांपासून ही ओपीडी सुरु करण्यात आली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी सुमारे 1,200 पुरुष लैंगिक-संबंधित समस्यांच्या उपचारांसाठी रुग्णालयात येतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत.


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वर्षभरात सरासरी 500 लोक इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या घेऊन ओपीडीमध्ये येत असल्याचं चित्र आहे. याशिवाय 250 लोक premature ejaculation च्या तक्रारी घेऊन येतात. 150 लोकांमध्ये स्पर्मची संख्या कमी असल्याची समस्या असल्याचं दिसून आलंत. तर 50 लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या शून्य आहे.