मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण घरी आहेत. अनेकदा रात्री झोपताना तुमच्यापैकी किती जण मोबाईल अथवा टीव्ही पाहत पाहत झोपता? एकदा नाही अनेकदा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींच तर उत्तर असेल की ही तर आमची सवयच आहे.... तर या सवयीचा तुमच्यावर दुष्परिणाम होत आहे, याची तुम्हाला जाणीव आहे का? मोबाईल आणि टीव्ही जागेपणी वापरण तर धोकादायक आहेच पण रात्री झोपताना देखील त्याचा अती वापर करणं घातक आहे. 


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही टीव्ही अथवा मोबाईल बघत झोपत असाल तर तुमच्या शरीराला ते अतिशय घातक आहेत. तुमच्या कंबरे खालच्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. संशोधकांनी जवळपास ४३,७२२ अमेरिकेतील महिलांवर संशोधन केलं आहे. यामध्ये ३५ ते ७४ वयोगटातील महिलांचा समावेश आहे. या संशोधनातून असं समोर आलं की, महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर आजारांना सामोरं जाव लागत आहे. 


असे संशोधनात आढळले आहे की, ज्या स्त्रिया टीव्ही पाहत झोपत नाहीत त्यांचे वजन कमी राहण्यास मदत होते. कारण टीव्ही पाहण्याची सवय असणाऱ्या महिलांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. अशा महिलांना वजन वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. 


जामा इंटरनॅशन मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या अभ्यासातून संशोधकांनी सांगितले की, टीव्ही सुरू ठेवून झोपल्याने झोपेशी निगडीत असलेलं स्लीप हार्मोन मॅलिटोनिन प्रभावित होतो.