Best Sleeping Position : झोपायला कोणाला नाही आवडत. सध्या धावपळीच्या जगात 100 पैकी 95 लोकांना झोपेची तक्रार असते. त्या लोकांची प्रकृतीदेखील खालावलेली दिसते. निरोगी शरीरासाठी रात्रीची झोप खूप महत्त्वाची आहे. किमान 8 तास झोप तुमची पुर्ण होत असल्यास तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटते. (the right way and direction to sleep at night NZ)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या झोपेत कमतरता असल्यास तुम्हाला आजार होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजार उद्भवू शकतात. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानात देखील सांगितलं जाते की, रात्रीची झोप आवश्यक आहे. तुमची झोपण्याची पद्धत योग्य असावी याकडेही लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. 


रात्रीचे झोपायला सगळ्यांनाच आवडते पण त्याच्या काही पद्धती असतात. त्या पद्धतींचा वापर केल्यास तुमची झोप चांगलीच पुर्ण होईल. तर आज आपण अशाच काही पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत.


work smarter : स्मार्ट वर्क करताय या गोष्टी पाळा, होईल जबरदस्त फायदा...


झोपण्याची सर्वोत्तम दिशा


आयुर्वेदानुसार दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे. दक्षिण नकारात्मक चार्ज आहे आणि तुमचे डोके सकारात्मक चार्ज आहे, जर तुम्ही उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्यास ऊर्जा बाहेर फेकली जाते व दक्षिणेकडे डोके असल्यास आरोग्य, आनंद आणि समृद्धी वाढवणारी ऊर्जा तुमच्या शरीरात खेचली जाते.


एका अभ्यासात काही स्वयंसेवकांना 12 आठवडे दक्षिण दिशेला डोके करून झोपण्याची सूचना करण्यात आली होती. यानंतर त्यांचा सिस्टोलिक रक्तदाब, डायस्टोलिक रक्तदाब, हृदय गती संतुलित आणि सीरम कॉर्टिसॉल कमी झाल्याचे निदर्शनात आले.


झोप पुर्ण झाल्यास तुम्हाला त्याचे चांगलेच फायदे देखील पाहायला मिळतात. रात्रीचे जेवण 8 ते 9 च्या आत घ्यावे. ज्यामुळे अपचनसारखा त्रास जाणवत नाही. रात्रीच्या झोप चांगली झाल्यास त्याचा दुसऱ्या दिवशी हाती घेतलेल्या कामांवर फरक जाणवतो.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)