मुंबई : दररोज सकाळी भरपेट नाश्ता केलाच पाहिजे असं अनेकदा आपण ऐकतं असतो. पण याकडे आपण तितकसं लक्ष देत नाही. दररोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी सर्वोत्तम, महत्त्वपूर्ण असणाऱ्या सकाळच्या नाश्ताकडे दुर्लक्ष करतो. कामं उरकण्याच्या नादात थोड्या वेळाने खाऊ, नंतर खाऊ असं करत अनेक जण सकाळच्या नाश्ता करतच नाहीत आणि हेच आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. तुम्ही सकाळच्या नाश्ता करत नाही आणि रात्रीही उशिरा जेवण करत असाल तर तुमच्या शरीराला यामुळे मोठा धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञ, संशोधकांकडून देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिवेन्टिव कार्डियोलॉजीचे यूरोपियन जर्नल 'द फाइंडिग्स'मध्ये छापण्यात आलेल्या एका शोध पत्रात, अशाप्रकारे अस्वास्थ जीवनशैली असणाऱ्या लोकांचा वेळेच्या आधीच मृत्यू होत असल्याचा धोका चार ते पाच टक्क्यांनी वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच सतत सकाळचा नाश्ता न केल्याने, टाळल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट झालं आहे.



ब्राझीलमधील साउ-पाउलो या सरकारी विद्यापीठातील मार्कोस मिनीकुची यांनी 'आमच्या संशोधनात असं समोर आलं की, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, ही सवय तशीच सतत, कायम ठेवल्याचा परिणाम अतिशय वाईट होत असून याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढत असल्याचं' त्यांनी म्हटलं आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या 60 वर्षांपर्यंतच्या 113 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनात 73 टक्के पुरुष होते. यापैकी सकाळी नाश्ता न करणाऱ्या 58 टक्के पुरुषांचा समावेश आहे. तर रात्री उशिरा जेवणाऱ्यामध्ये 51 टक्के पुरुषांचा समावेश आहे. 48 टक्के पुरुषांमध्ये या दोन्ही चुकीच्या सवयी आढळून आल्या. 



अशाप्रकारे अस्वास्थ जीवनशैली जगणाऱ्या अनेकांनी त्यांच्या सवयीत बदल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. रात्री जेवण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेत कमीत कमी 2 तासांचं अंतर असणं आवश्यक आहे. दुपारच्या जेवणापेक्षाही सकाळचा भरपेट नाश्ता गरजेचा असतो. सकाळचा नाश्ता न केल्यानं मधुमेहाचा धोकाही वाढतो. उत्तम प्रतीच्या नाश्त्यामध्ये अधिकतर दुग्धजन्य पदार्थ, कार्बोहायड्रेड, मोड आलेली कडधान्य आणि फळांचा समावेश असणं गरजेचं आहे.