Health news: या चार कारणांमुळे वाढतंय तुमचं वजन
वजन कमी करण्यापूर्वी वजन वाढण्याची कारणं शोधणं फार महत्वाचं आहे.
मुंबई : तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनाने त्रस्त आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते. मुख्य म्हणजे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की निरोगी आहार आणि नियमित व्यायाम हे वजन घटवण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक आहेत. या दोन घटकांव्यतिरिक्त वजन वाढण्यामागे अनेक संभाव्य कारणं आहेत. वजन कमी करण्यापूर्वी वजन वाढण्याची कारणं शोधणं फार महत्वाचं आहे.
अनावश्यक वजन वाढणं केवळ शरीरासाठी हानिकारक नसतं, तर ते आपले व्यक्तिमत्त्वासाठी देखील अयोग्य ठरतं. बहतांश प्रकरणांमध्ये, आपल्या वाईट सवयी या वजन वाढण्यामागे कारणीभूत असतात. जाणून घेऊया वजन वाढण्याची कारण काय आहेत.
पूर्ण झोप न घेणं
पुरेशी झोप न घेतल्याने वजनात वाढ होते. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात, की रात्री 7 ते 8 तास झोप न घेतल्यामुळे शरीरात कोर्टीसोल नावाचा हार्मोन तयार होऊ लागतो. यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शक्य तितका वेळ शरीराला झोप द्या.
सकाळचा नाश्ता न करणं
आजकाल बहुतांश लोकं व्यस्त वेळापत्रकांमुळे सकाळी नाश्ता करत नाहीत. या कारणामुळे वजन वाढू शकतं. सकाळी नाश्ता न केल्याने चयापचय प्रणाली कमकुवत होऊ लागते. शिवाय आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागते. परिणाम आपण जास्त प्रमाणात खातो आणि वजन वेगाने वाढू लागतं.
पाण्याची कमतरता
पुरेसं पाणी न पिणं हे वजन वाढवण्यामागील कारण असू शकते. डॉ रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आपण दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. आपण हे न केल्यास पचनक्रियेचा योग्य पद्धतीने होत नाही आणि आपलं वजन वाढू शकतं. दरम्यान दररोज सकाळी कोमट पाणी पिण्यामुळे वजन कमी होऊ शकतं.
चुकीच्या खाण्याच्या सवयी
वजन कमी करण्यात चुकीच्या खाण्याच्या सवयी देखील कारणीभूत आहे. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या अन्नातून किती कॅलरी घेतल्या पाहिजेत हे माहित असलं पाहिजे. जरी तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल आणि आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेत असाल तरीही आपले वजन कमी होणार नाही.