Unhealthy Habits: या 3 चुकीच्या सवयी तुमचं शरीर कमकुवत करतायत
आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी कोणत्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत.
मुंबई : आपले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती मानली जाते, याकडे दुर्लक्ष करून आपण अनेक आजारांना बळी पडतो. यामुळे तुमचं शरीर कमकुवत होतं. जर तुम्हीही या 3 वाईट सवयींचे बळी असाल तर तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी कोणत्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत.
हिरव्या भाज्या खा
आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश न करण्याच्या सवयीमुळे पोट आणि शरीराच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. दररोज हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळतं. सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा असे पदार्थ रोज खात जा.
जंक फूड खाणं टाळा
बिझी शेड्यूलमुळे लोक पॅकेज केलेले आणि जंक फूड जास्त खाऊ लागलेत. त्यामुळे शरीरात साखर, ट्रान्स फॅट आणि सोडियमचं प्रमाण वाढत आहे. या गोष्टींमुळे कॅन्सर, हृदयविकार, उच्च रक्तदाब, संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती अशा समस्यांना बळी पडू शकतात.
चुकीच्या खाण्याच्या सवयी
दिवसभर बसून शारीरिक हालतान केल्याने जीवनशैली बिघडत चाललीये. खराब जीवनशैलीमुळे स्नायू आणि अवयव कमकुवत होतात. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, कमकुवत हाडं, पक्षाघात, हृदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका वाढतो.