मुंबई : लग्न म्हटलं की लगबग आणि घाईगडबड आलीच...लग्नाच्या वेळी वधू-वरांच्या पत्रिका जुळवल्या जातात. याशिवाय कौटुंबिक स्थिती, आर्थिक परिस्थिती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र लोक एका खास गोष्टीकडे लक्ष द्यायला विसरतात, ती म्हणजे मेडिकल फिटनेस टेस्ट. लग्नानंतरच्या समस्या टाळण्यासाठी लग्नाअगोदर काही मेडिकल टेस्ट करणं फार गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरही नेहमी हा सल्ला देतात की, एखाद्या व्यक्तीसोबत बनवण्यापूर्वी 4 वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजेत. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुधारू शकतंच शिवाय भविष्यात शारीरिक समस्याही टाळता येतील.


जेनेटिक डिसीस टेस्ट


तुम्ही तुमच्या होणाऱ्या लाईफ पार्टनरची जेनेटिक डिसीस टेस्ट करून घेतली पाहिजे. अनुवांशिक रोग किंवा आजार असेल तर तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होऊ शकतो. त्यामुळे ही टेस्ट महत्त्वाची आहे.


Blood Group Compatibility Test


आजकाल Blood Group Compatibility Test ट्रेंडही वाढताना दिसतोय. ही टेस्ट कुटुंब नियोजनासाठी महत्त्वाची मानली जाते आहे. जर दोन्ही जोडीदारांचा आरएच फॅक्टर सारखा असेल आणि रक्तगट कॉम्पेटिबल असेल ते गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या समस्यांपासून महिलांना वाचवू शकतं.


इनफर्टिलिटी टेस्ट


एखादी व्यक्ती मूल जन्माला घालण्यास किती सक्षम आहे हे  इनफर्टिलिटी टेस्टद्वारेच कळू शकतं. कारण त्याच्याशी संबंधित लक्षणं डोळ्यांनी दिसता येणाऱ्यासारख नसतात. या चाचणीद्वारे पुरुषांच्या स्पर्मची संख्या आणि महिलांच्या गर्भाशयाच्या ओव्हरी हेल्थची माहिती घेता येते. हे बाळाचं नियोजन आणि चांगले शारीरिक संबंध राखण्यात मदत करतं.


STDs Test


आजकाल लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याला समाजाची स्विकृती मिळाली आहे. पण त्याचबरोबर लैंगिक आजारांचा धोकाही वाढला आहे. अशा रोगांमध्ये एचआयव्ही एड्स, नागीण, सिफिलीस आणि हेपेटायटीस सी यांचा समावेश आहे. यासाठीच लग्नाअगोदर लैंगिक संक्रमित रोग चाचणी (STDs टेस्ट) करायला विसरू नका. कारण लग्नानंतर हे आजार तुमच्या जीवनसाथीद्वारे तुमच्यापर्यंत पसरू शकतात.