मुंबई :  रोजच्या काही सवयींचा शुक्राणूंच्या (sperm) संख्येवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. याचं कारण म्हणजे चुकीचा आहार आणि लाईफस्टाईल (Lifestyle) आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही सेक्स संबंधित समस्या येत असतील तर त्यामागे काही वाईट सवयी असू शकतात.  तुम्हाला अशाच काही वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या पुरुषांनी ताबडतोब सोडल्या पाहिजेत. (these 5 bad habits reduce sperm count in men be alert today)


तणाव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुषांमध्ये तणावामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी असू शकते. पुरुषांमध्ये चिंता आणि तणावामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. त्यामुळे तुम्हालाही आनंदी रहायचे असेल तर तणाव घेणं आधी थांबवा.


व्यायामाचा अभाव


व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणाच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. लठ्ठपणामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या प्रजननक्षमतेवर होतो. त्यामुळे आत्तापासूनच एका जागी बसणे बंद करा.  यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि वजन वाढतं. त्यामुळे पुरुषांना त्यांचं सेक्स लाईफ चांगले हवं असेल तर दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. 


पॅन्टच्या खिशात मोबाईल


पुरुषांनी आपला मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते. कारण मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेंजचा शुक्राणूंवर वाईट परिणाम होतो.


रात्री उशिरा झोपणं


रात्री उशिरा झोपल्यामुळे तणाव आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. इतकंच नाही, तर रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ शकते. याचा परिणाम पुरुषांच्या शुक्राणूंवरही होतो.