मुंबई : Junk Food आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपल्याला कायमच सांगण्यात आलं आहे. Junk Food म्हणजे नेमकं काय हेसुद्धा नव्यानं सांण्याची काहीच गरज नाही. असे पदार्थ खाण्याचा वाईट परिणाम शरीरावर नेमका किती आणि कोणत्या प्रकारे होतो हेसुद्धा आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, तुम्हाला माहितीये का, Junk Food मध्ये काही असेही पदार्थ आहेत, जे खाल्ल्यामुळे आरोग्याला इजा पोहोतच नाही, असं म्हटलं जातं. 


रताळं 
रताळं हे कंदमूळ डोळ्यांसाठी चांगलं असतं. सोबतच हे हृदयरोगापासून दूर राहण्यासही मदत करतं. तंतूंचटं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील वाईक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही याचा वापर होतो. 



आईस्क्रम 
आईस्क्रीम खाल्ल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होत. यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळं शरीरा उर्जाही अधिक प्रमाणात येते. 


आईस्क्रीममध्ये असणारे विटामिन बी-12, बी-2 आणि विटामिन-ए त्वचा, हाडं आणि रोगप्रतिकारक शक्ती आणखी सुधारण्यात मदत करतात. 



डार्क चॉकलेट 
डार्क चॉकलेटमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स हे मेंदूपासून हृदयापर्यंत शरीरातील महत्त्वाचे घटक सुदृढ करण्यास कारणीभूत ठरवतात. डार्क चॉकलेटमुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका 50 टक्के कमी होतो. नैराश्य कमी करण्यासाठीही डार्क चॉकलेट फायद्याचं ठरतं. 



बटाट्याचे वेफर्स 
सहसा वेफर्स खाल्ल्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. मुळात मात्र बटाट्याच्या वेफर्समध्ये पोटॅशियम, पँटोथॅनिक एसिड, विटामिन-ई, विटामिन-सी, विटामिन-बी6 अशी तत्वं असतात. 



पॉपकॉर्न 
अमेरिकन इंस्टीट्यूट फॉर कँसर रिसर्चनुसार पॉपकॉर्नमध्ये पॉलीफेनोल तत्व असतात. पॉपकॉर्नमध्ये अधिक तंतूमय घटक असतात. पचनासंबंधीच्या समस्या असल्यास पॉपकॉर्न खाणं फायद्याचं ठरतं.