हसण्याचे आयुष्यावर होतात असे परिणाम... जाणून घ्या
मोकळेपणाने हसणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
Benefits of Laughing: आपल्या दगदगत्या आयुष्यात आपलं हसण्यासाठीही फार कमी वेळ काढतो. सततच्या धावपळीमुळे आपल्यावर एक वेगळा ताणही असतो. त्यामुळे हसण्याचे प्रसंगही कमी येतात. परंतु मनमोकळं हसणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण हसलो की आपल्या आजूबाजूचं वातावरणही सकारात्मक राहतं. परंतु तुम्हाला माहितीये की तुमच्या निखळ हसण्याने तुमच्या शरीरावरही परिणाम होतात. (Benefits of Laughing on Health) तेव्हा जाणून घेऊया जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. (these are the benefits of laughing for your health and life know more)
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
मोकळेपणाने हसणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हसण्याने शरीरात सकारात्मक हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
जर तुम्हाला स्पॉन्डिलायटिस किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही मोकळेपणाने हसूनच या दुखण्यापासून मुक्त होऊ शकता. एवढेच नाही तर 10 मिनिटे हसत हसत हसत राहिल्यास काही तासांच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
हसण्याने तुमचा मूड चांगला राहतो हे सर्वांना माहीत आहे. कारण हसण्याने शरीर अधिक मेलाटोनिन तयार करते, ज्यामुळे व्यक्तीला चांगली झोप लागते. ज्यामुळे तुम्ही डिप्रेशनला बळी पडत नाही.
जर तुम्ही नेहमी हसत असाल तर त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो, तसेच तुम्हाला शरीरातील अनेक प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळते. शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे संपूर्ण शरीराला आनंद होतो, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.