Benefits of Soaked Grams: आपल्या आहारात हरभऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण कडधान्य खाण्याची टाळाटाळ करतो. पण तुम्हाला माहितीये का की हरभऱ्यांचे अनेक फायदे आहेत आणि त्यातून जर ते भिजवलेले हरभरे (Benefits of soaked gram) असतील तर त्याचे फायदेही अनेक आहेत. (these are the benefits of soaked gram health news viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभरा डाळ पचण्यास जड आहे. तसंच ती उष्ण, तुरड-गोड चवीची आहे. त्यामुळे वातदोष वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच, वातप्रकृतीच्या व्यक्तींनी हरभरा डाळ किंवा हरभऱ्याचं सेवन करु नये. हरभऱ्यांमुळे पचनशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी हरभऱ्याचं सेवन टाळावं. तसंच डाळीच्या पीठापासून केलेले पदार्थ देखील जास्त खाऊ नये.


 


  • शरीरातील रक्ताचं प्रमाण योग्य राहते. 

  • भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं शरीराला पुष्कळ प्रमाणात लोह मिळतं. 

  • रोगप्रकारशक्ती आणि स्टॅमिना वाढतो, शरीर मजबूत होते. भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये मँगनीज, थायामिन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. 

  • भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिनं, कर्बोदकं, चरबी, फायबर (Fiber), कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वं आढळतात. भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं रक्त शुद्ध होतं तसेच मेंदू तीक्ष्ण होतो.

  • भिजवलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. 

  • हरभऱ्यामध्ये मॉलिक अ‍ॅसिड, ऑक्झालिक अ‍ॅसिड यामुळे अपचनाच्या अशा समस्या दूर होतात.

  • हरभऱ्यांमुळे त्वचेचे विकार होत नाहीत तसेच हे केसांवरही गुणकारी आहे. शरीराचा घाम नियंत्रित करण्यासही हरभऱ्यांची मदत होते. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)