मेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी `या` संकेतांकडे दुर्लेक्ष करू नका
Symptoms of Menopause: मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सोबतच ती थांबणंही परंतु अशावेळी तुम्हालाही (Pre - Menopause Symptoms) काही मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मोनोपोझची लक्षणे काय आहेत?
Menopause Symptoms in Marathi: मासिक पाळी ही योग्य वेळेत होणंही अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्यालाही पुढे पाळी थांबायची वेळी काही त्रास होत नाही. त्यामुळे आपल्याला पाळी थांबायच्या आधीच्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला जर का मोनोपोझच्या (Menopause in Women) आधी हे संकेत दिसायला लागले तर समजा तुमची पाळी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याचसोबत तुम्हालाही जर का असं वाटतं असेल की आपल्याला योग्य तो वैद्यकीय सल्ला घेण्याचीही गरज आहे तर त्याप्रकारे तुम्ही योग्य ती पावलं उचलणंही आवश्यक आहे.
अनेकदा मोनोपोझ होतो त्यावेळेला स्त्रियांना अनेकदा कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातून त्यांचा शारिरीक ताण हा वाढूही शकतो. मोनोपोझ जवळ आला असताना जर का तुम्हाला काही शारिरीक त्रास नको असेल तर तुम्हीही मोनोपोझच्या लक्षणांकडे दुर्लेक्ष करू नका. महिलांमध्ये वयाच्या 13 व्या वर्षापासून ते वयाच्या 53-55 वर्षांपर्यंत (Age of Menopause) मासिक पाळीचा संबंध येतो. त्यानंतर मासिक माळी पुर्णपणे बंद होते. मासिक पाळी साधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर थांबते परंतु त्यापुर्वी काही लक्षणेही तुम्हाला लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. रजोनिवृत्ती होताना तुम्हाला योग्य त्या गोष्टींचा आपल्या आहारातही समावेश करणे आवश्यक ठरते.
नैसर्गिकरीत्या मासिक पाळी ही (Menopause Naturally) बंद होते. यातही काही लक्षणे दिसून येतात. सर्वात आधी काही महिलांना मेनोपोझच्या जास्त रक्तस्त्रावही (Blooding) होतो. त्यानंतर काही महिने मासिक पाळी येते तर काही महिने मासिक पाळी येतही नाही. तेव्हा अशावेळी खूप पोटदुखी, पायदुखी आणि कंबरदुखी वाढू लागते. तुमच्या झोपेवरही किचिंत त्याचा परिणाम होऊ शकतो.
काय आहेत लक्षणे? (Symptoms of Menopause)
वर म्हटल्याप्रमाणे मोनोपॉझच्या वेळी तुम्हाला अनियमित मासिक पाळीचा सामना करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वजायनाच्या भागाला ड्रायनेस जाणवतो.
तुमचे वजन वाढते. त्यानंतर तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. तुमचं मेटबॉयलिझन कमी होते. त्यानं वजन वाढू लागते.
तुमची त्वचा ड्राय होऊ शकते. केस गळू लागतात. रात्री झोपेत जास्त घाम येऊ लागतो. झोप येत नाही.
अशावेळी भावनिक बदलही होत असतात. तुम्हाला अशा प्रसंगी मूड स्विंग्सही होयला लागतात. तुमचे डोकं दुखू लागू शकते आणि हृदयाचे ठोकेही वाढू शकतात.
अशावेळी तुमच्या आहारातही तुम्ही हेल्थी पदार्थांचे सेवन करू शकता, शक्यतो तुम्ही बाहेरचे जंक फुड खाणं टाळा. त्यातून तुम्ही रोज योगासनंही करू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)