Cherry Tomato: सध्याच्या जीवनात आपलं धावपळीचे आयुष्य फार वाढले आहे. त्यातून आपल्याला खाण्यापिण्याच्याही सवयी बदल्या आहेत. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणेही प्रचंड महत्त्वाचे झाले आहे. त्यातून आहारातही योग्य फळांचा वापरही आपण केला पाहिजे. तुम्हाला माहितीये का की चेरी टॉमेटोज आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. चेरी टॉमेटोज खाल्यानं आपल्याला हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगला फायदा होऊ सकतो. त्यासाठी आपल्याला चेरी टॉमेटोजमधून कोणते फायदे मिळतात हे आपण या लेखातून जाणून घेऊ शकता. आपल्याला आहारात फळभाज्यांचेही फार वेगळे महत्त्व आहे. आपल्याला फळभाज्या खाल्यानं फार वेगळा फरक जाणवू शकतो. त्यामुळे आपल्या आहारात फळभाज्याही फार महत्त्वाच्या आहेत. चेरी टॉमेटोच्या फायद्यांनी तुमच्या हे लक्षातही येईल. या लेखातून ते सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेरी टोमॅटोजचा वापर आपल्या रोजच्या आहारातही होतो. जसे की, पिझ्झा, पास्ता, सलाड, स्मुदी, सुप अशा वेगवेगळ्या पदार्थांतून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. मुळात चेरी टॉमेटो खाल्ल्यानं तुमचं वजन कमी करण्यातही मदत होते त्याचसोबत कर्करोग, हृदयरोग आणि त्वचेच्या रोगावरही चेरी टॉमेटो आपल्या फायद्याचे ठरतात. चेरी टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी, मिनिरल्स म्हणजेच पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंस्ट्स म्हणजेच लायकोपिनी अशा गोष्टी आहेत. जे तुम्हाला तुम्हाच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की चेरी टॉमेटोचे आपल्या शरीरासाठी कोणकोणते फायदे होऊ शकतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया सर्वप्रथम चेरी टॉमेटोचा आपल्या त्वेचेसाठी किती चांगला फायदा होतो ते. 


हेही वाचा : रात्री झोपेत लाळ गळते? ही समस्या फटक्यात कमी करण्यासाठी 'हे' कराच


त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी  - 
चेरी टॉमेटोज हे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. जसे आपल्या त्वेचेसाठी ते फारच गुणकारी असतात. चेरी टॉमेटोमध्ये एन्टीऑक्सिडंट्स असतात. ज्याचा फायदा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करायलाही होतो. 


वजन कमी करण्यासाठी - तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु एवल्याश्या चेरी टॉमेटोचा फायदा हा आपल्याला आपलं वजन कमी करण्यासाठीही होतो. आपण आपल्या जेवणात चेरी टॉमेटोचा वापर करू शकता. वर म्हटल्याप्रमाणे, स्मुदी, सुप, सलाड, पिझ्झा, पास्ता अशा वेगवेगळ्या गोष्टींतून त्याचा फायदा आपल्याला करता येतो. 


डोळ्यांसाठी - चेरी टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन ए असते. ज्याचा फायदा आपल्याला आपल्या डोळ्यांसाठी होतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी जर का कमी झाली असेल तर आपल्याला त्याचा फायदा होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हीही याचे सेवन आपल्या आहारातून करू घेऊ शकता. 


रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी - रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. तेव्हा अशावेळी आपल्याला चेरी टॉमेटो खाल्ल्यानं चांगला फायदा होऊ शकतो.