झोपेत तुमच्याही तोंडातून लाळ गळते? तर दुर्लक्ष करू नका, हे' उपाय करा

Drooling Remedies in Marathi: आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या काहीना काही समस्या या भेडसावू शकतात. त्यामुळे अशावेळी काय करावं हे आपल्यालाही कळतं नाही. त्यातीलच एक समस्या म्हणजे लाठ गळणे ही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की यावर उपाय काय आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: Sep 6, 2023, 10:34 PM IST
झोपेत तुमच्याही तोंडातून लाळ गळते? तर दुर्लक्ष करू नका, हे' उपाय करा title=
Home remedies to stop drooling salivation problem while sleep in Marathi

Drooling Remedies in Marathi: आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यातून लाळ गळ्याची समस्यांही अनेकांना सतावत असते. त्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय योजना करणं हे भागचं असतं. लहान मुलांच्या तोंडून लाळ गळते हे आपल्यालाही माहितीच आहे. त्यातून त्यांना दात नसल्यानं आणि येण्याच्याच मार्गावर असल्यानं त्यांची लाळ गळ्याची समस्या ही फारच कॉमन असते. परंतु मोठ्या माणसांनाही ही समस्या भेडसावत असते. त्यावेळी या लेखातून आपण जाणून घेऊया की, नक्की आपल्याला ही लाळ गळण्याची समस्या का असते आणि त्यावर आपण नक्की कोणते कोणते उपाय करू शकतो याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. लाळ गळणे ही जर का तुम्हालाही समस्या भेडसावत असेल तर काळजी करू नका कारण यावर तुम्ही घरगुती उपायही करू शकता. त्यासाठी हा लेख पुर्ण वाचा. 

लाळ गळणं म्हणजे काय असतं? 

रात्री झोपेत आपण ज्याप्रमाणे घरतो त्याप्रमाणेच निद्रा अवस्थेत असताना अजाणतेपणी आपल्याला लाळ गळण्याचाही त्रास होऊ शकतो. यावेळी आपल्या तोंडातून फार जास्त लाळही पडू शकते आणि त्याचे प्रमाणही कमी असू शकते. आपल्या तोंडून लाळ गळतं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा थेट हसण्यावारीही नेऊ नका. यावर योग्य तो इलाज करणं गरजेचे आहे आणि त्यातून यामागील कारणंही समजून घेणे आवश्यक आहे. खरंतर ही समस्या आपल्याला आपल्या चुकींच्या सवयीमुळे देखील होऊ शकते किंवा तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तरीदेखील तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. 

काय आहे कारणे? 

- लाळ गळण्यामागे तुम्हाला कोणती एलर्जी असेल तर त्याचाही परिणाम होऊ शकतो. 
- त्यासोबत काही वेगळा त्रास असेल म्हणजे उदाहरणार्थ सर्दी-खोकला किंवा श्वसनाचे रोग तरीदेखील लाळ गळ्याची समस्या उद्भवू शकते. 
- पोटाच्या समस्या किंवा कोणत्या गॅस्ट्रीकच्या समस्या, अपचनाच्या समस्या असतील तर त्याचाही आपल्याला फटका होऊ शकतो. 
- झोपेच्या समस्येमुळेही लाळ गळण्याचीही समस्या वाढू लागते. 
- सतत बाहेरचं खाल्लानंही ही समस्या भेडसावू शकते. 
- मानसिक आजारांमुळेही हा त्रास आपल्यालाही होवू शकतो. 
- सगळ्यात महत्त्वाचे कारणं म्हणजे जर का तुम्ही आमली पदार्थांचे सेवन करणार असाल तरीही तुम्हाला त्याची समस्या भेडसावू शकते. 

काय करावेत उपाय? 

तुम्हाला जर का लाळ गळ्याची समस्या असेल तर गरम पाण्याच्या गुळण्या करा, तुळशीची पानं खा. किंवा जेवल्यानंतर गरम पाण्यातून आवळा पावडर घालून ते पाणी प्या. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)