Benefits of Green Chillies: मिरची मग ती लाल असो वा हिरवी... मसालेदार पदार्थांसाठी हिरवी मिरची ही आपल्याला लागतेच लागते. त्याशिवाय कुठल्याही पदार्थाला मजा येत नाही. मिरचीची जादू संपुर्ण जगात फिरते. असा कुठेलाही देश किंवा प्रदेश नाही जिथे आहारात मिरचीचा वापर होतोच होतो. तेव्हा जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे फायदे... हे वाचून तुम्हीही नक्कीच म्हणाल की जीभेवर झोंबणारी मिरची ही तर वरदान आहे. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन - सी असतं तसेच बीटा - कॅरोटीन देखील असते ज्यामुळे आपल्या त्वचेला त्याचा फायदा होतो. या गुणधर्मांमुळे त्वचा उजळते. 

  • हिरव्या मिरचीमध्ये असे अनेक घटक आढळतात जे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात तसेच बीटा कॅरोटीनसह क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन-झेक्सॅन्थिन इत्यादी आरोग्यपुर्ण गोष्टीही असतात. 

  • या मिरचीमध्ये लोह्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे रक्तप्रवाह योग्यरीत्या होण्यास मदत होते. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत असेल तर शरीरही तंदुरूस्त राहते आणि आपल्यातील क्षमता वाढते ज्यामुळे अशक्तपणा येतं नाही. हिरव्या मिरच्या खाल्ल्यानं तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. 

  • हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचं कंपाऊंड असतं. जे आपल्या डोक्याच्या भागात असणाऱ्या हाईपाथेलेमसच्या केंद्राला सक्षम करण्यास मदत करतो. त्यामुळे मेंदू तसेच शरीरातील काही भागांचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यातून मानसिक आरोग्याकडं पाहिलं तर मिरचीमुळं आपलं मनं, मूडही ताजेतवाने राहते. 

  • हिरव्या मिरचीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजनावरही नियंत्रण मिळते असेही तज्ञांचे म्हणणे आहे.