मुंबई : कोणत्याही नात्यात प्रेम, विश्वास आणि विश्वासासोबतच जिव्हाळा असणे खूप गरजेचे असते. जिव्हाळ्यामुळे नाते घट्ट होते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या लैंगिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामागे तुमच्या काही सवयी कारणीभूत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याला तुमच्या सवयी जबाबदार आहेत. ज्याचा तुमच्या सेक्स लाईफवर नकळत वाईट परिणाम होतो. 


चुकीचा आहार- जर तुम्हाला जंक फूड जास्त आवडत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीरात कार्ब्स, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स जमा करताय. यामुळे रक्तप्रवाह खूप मंद होतो तसेच अशा गोष्टींचा सेक्स लाईफवर वाईट परिणाम होतो. या गोष्टींऐवजी फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले. सकस पदार्थ खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.


जास्त मीठ खाणे- दररोज जास्त मीठ खाल्ल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे कामवासना कमी होऊ शकते. बर्‍याच प्रीपॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते खाणे टाळा.


तणाव - जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे बराच काळ त्रस्त असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतोच शिवाय जवळीक साधण्याची इच्छाही कमी होते. जर तुम्हाला लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर तणावापासून दूर राहा आणि तुमची समस्या लवकरात लवकर सोडवा.


एकमेकांशी मोकळेपणाने बोला - जर तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफशी संबंधित एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा तुमच्याकडे त्यात सुधारणा करण्याच्या कल्पना असतील तर त्याबद्दल तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. जर तुम्ही त्याबद्दल बोलण्यास संकोच करत असाल तर त्याचा तुमच्या दोघांवर परिणाम होईल.


वजन वाढणे- जर तुम्हाला लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर तुमचे वाढलेले वजन कमी करणे महत्त्वाचे आहे. जास्त वजनामुळे तुमच्या कामगिरीवर वाईट परिणाम होतो. विशेषतः जर तुम्ही पुरुष असाल. एका अभ्यासातून समोर आले आहे की ज्या पुरुषांची कंबर 40 इंचांपेक्षा जास्त आहे त्यांना नपुंसकतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.