मुंबई : आपल्याला शरीराचा विकास हा नैसर्गिक आहे. कालांतराने आपल्या शरीराची आपोआप वाढ होत राहते. पण मेंदूच्या बाबतीत हे अजिबात नाही. मेंदुला चालणा मिळण्यासाठी आपल्याला त्याला आवशक ते पोषण पदार्थ देण्याची गरज आहे. एवढेच नाही तर, आपल्याला अशा काही सवयी असतात ज्याचा आपल्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या मेंदूसाठी अजिबात चांगल्या नाहीत. अशा गोष्टी आणि सवयीं कोणत्या या जाणून घेऊया.


झोप आणि झोपण्याचे प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्त झोप येणे आणि झोप न येणे या दोन्ही गंभीर समस्या आहेत. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे चांगली झोप घेत नाहीत. तर तुम्हाला यामुळे कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नाही तर जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्यामुळे तुमचा मृत्यूही होऊ शकतो.


याशिवाय जर तुम्ही तोंड झाकून झोपलात तर ते मेंदूच्या पेशींची वाढ थांबवते. याचे कारण असे की, ते कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढवते आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी करते. ज्याचा परिणाम मेंदूवर होतो.


​साखरेचे अधिक सेवन


आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत असाव, तर ते शरीरातील पोषक आणि प्रथिने शोषण्यास अडथळा आणते. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित होते.


एवढेच नाही तर जर जास्त काळ साखरेचे सेवन केले, तर ते कुपोषणाचे कारण बनते. हे मेंदूचा विकास देखील कमी करते.


​रिएक्शन पडू शकतं महागात


आपण सर्वजण मुख्यतः छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देतो किंवा रागाच्या भरात ओरडू लागतो. जर तुम्ही तुमचे मागील काही दिवस काळजीपूर्वक पाहिले, तर तुम्हाला कळेल की, तुम्ही अलीकडे किती रागावले आहात.


पण तुम्हाला माहिती आहे का की, कोणत्याही गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देणे तुमच्या मेंदूसाठी अजिबात चांगले नाही. वास्तविक जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या हार्ड होऊ लागतात. यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमकुवत होऊ लागते.


नाश्ता वगळणे


नाश्ता हे दिवसातील सर्वात आवश्यक जेवण मानले जाते. हे आपल्याला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते. जर तुम्ही जवळजवळ 8 तास काहीही खाल्ले नसते. अशा स्थितीत आपल्या शरीराला सकाळी साखर आणि इतर पोषक तत्वांची भरपूर गरज असते. या परिस्थितीत, जर तुम्ही तुमचा नाश्ता जवळजवळ दररोज वगळत असाल, तर असे करणे थांबवा. कारण ते नंतर तुमच्या मेंदूवर परिणाम करु शकते.


इतर कारणे जे मेंदूसाठी धोकादायक


जर तुम्ही जास्त आजारी असाल आणि असे असूनही तुम्ही मेहनत करता किंवा अभ्यास करता किंवा मेंदूवर जोर टाकता तेव्हा मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ लागते.


जर तुम्ही यापैकी कोणत्याही दिनचर्या किंवा सवयींनी घेरलेले असाल, तर तुम्ही असे करणे त्वरित थांबवावे. तरच तुमचा मेंदू निरोगी राहील. या व्यतिरिक्त, आपल्या अन्नपदार्थांमध्ये अशा गोष्टी समाविष्ट करा, जे मेंदूसाठी फायदेशीर आहेत.